Dhangar Reservation Esakal
महाराष्ट्र बातम्या

Dhangar Reservation: "मी आधी धनगर नंतर आमदार"; आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पडळकर आक्रमक

धनगर समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश करण्यात यावा, या मागणीसाठी मागच्या कित्येक वर्षांपासून धनगर समाज आंदोलन करत आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

धनगर समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश करण्यात यावा, या मागणीसाठी मागच्या कित्येक वर्षांपासून धनगर समाज आंदोलन करीत आहे. १ सप्टेंबर रोजी मराठा आरक्षणाचा वाद पेटल्यानंतर राज्यात मराठा समाजाने आंदोलनाचं हत्यार उपसलं. त्यानंतर ओबीसी समाजानेदेखील अनेक ठिकाणी उपोषणं आणि मोर्चे काढण्यास सुरूवात केली आहे.

अशातच भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी भाजप सरकारला इशारा दिला आहे. धनगर आरक्षणाच्या मुद्यावरून पडळकर आक्रमक झाले आहेत. ट्विटरवर(एक्सवर) पडळकरांनी "मी पहिले धनगर नंतर आमदार गोपीचंद पडळकर ! नाद करू नका! यळकोट यळकोट, जय मल्हार!" पोस्ट लिहित भाजपसह सरकारला इशारा दिला आहे.

पडळकरांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांसह राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांनीही नाराजी व्यक्त केली होती. यानंतर पडळकरांनी ट्विटरवर केलेली ही पोस्ट चर्चेत आली आहे. या ट्विटनंतर धनगर समाजाच्या आरक्षणावरून आक्रमक झालेले पडळकर हे आमदारकीचा राजीनामा देण्याच्या विचारात आहेत का ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

एसटी संवर्गात समावेश करावा, यासाठी धनगर समाजाच्या वतीने अहमदनगरच्या चौंडी येथे उपोषण सुरु आहे. यशवंत सेनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात येत आहे. दोन आंदोलकर्त्यांची प्रकृती खालावली होती. दोघांनाही अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलेलं होतं. त्यातील अण्णासाहेब रुपनवर या उपोषणकर्त्याची प्रकृती जास्त बिघडल्याने त्यांना पुण्याला हलवण्यात आलेलं आहे. 'एबीपी माझा'ने हे वृत्त दिले आहे.

मागच्या पंधरा दिवसांपासून चौंडीमध्ये हे उपोषण सुरु असून अकराव्या दिवशी मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली होती. दोन दिवसांमध्ये बैठक घेऊन धनगर आरक्षणाच्या बाबतीत निर्णय घेऊ, असं आश्वासन त्यांनी दिलं. मात्र ही मुदत कालच संपलेली आहे.

आज (बुधवारी) खांबाटकी घाटामध्ये रास्ता रोको आंदोलन केलं आहे. राज्यभरात ऐकून २५ ठिकाणी रास्ता रोको होणार आहे. धनगर आरक्षणासाठी आंदोलक आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे. सरकार धनगर आरक्षणाच्या संदर्भाने काय भूमिका घेतं, हे पाहणंही महत्त्वाचं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Century : विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! KKR विरुद्ध शतकी खेळी अन् आशियात कोणालाच न जमलेला केला पराक्रम...

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सला खूप मोठा धक्का! मॅच विनर खेळाडूला दुखापत, उपचारासाठी लंडनला जाणार; स्पर्धेतून माघार निश्चित

IPL 2026 Playoff Scenario: विराट कोहलीचा झंझावात अन् RCB गुणतालिकेत अव्वल! KKR चे आव्हान संपले का? जाणून घ्या समीकरण

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीची पहिली धाव अन् सेलिब्रेशन जणू Century सारखं, चाहत्यांना हसू आवरेना... Viral Video ची मजेशीर गोष्ट

Milk Rate Hike: महागाईचा आणखी एक फटका! अमूलनंतर मदर डेअरीनेही दूध दर वाढवले, किती रुपयांनी? बजेट कोलमडणार

SCROLL FOR NEXT