Balasaheb Thorat does not seem to have written any letter against Nana Patole politics
Balasaheb Thorat does not seem to have written any letter against Nana Patole politics esakal
महाराष्ट्र

Nana Patole: "काँग्रेसमध्ये मी सध्या खूप राजकारण शिकलोय, पण..."; पटोलेंनी व्यक्त केली जाहीर नाराजी?

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : महाराष्ट्र काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण सध्या चव्हाट्यावर आलं आहे. नुकताच बाळासाहेब थोरात यांनी विधीमंडळ पक्ष नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. यापार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी काँग्रेसमध्ये आपण सध्या खूप राजकारण शिकायला मिळालं आहे, असं नाराजीच्या सूरातील वक्तव्य पटोले यांनी केलं आहे. (I have learned a lot of politics in Congress now Why did Nana Patole said it)

पटोले म्हणाले, मला काँग्रेसची विचारधारा पुढे न्यायची असून ती जिंकवायची आहे. मी एक शेतकरी कुटुंबातील सामान्य माणूस आहे. म्हणून मला या सर्व राजकारणात पडायचं नाही मी सरळमार्गानं राजकारणात आलो आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीनंतर मला खूप काही राजकारण शिकायला मिळालं आहे. आजवर मी असं राजकारण कधी केलं नव्हतं. पण मी या सारखं घाणेरडं राजकारणही कधी करणार नााही.

काँग्रेसमध्ये गटबाजी नाही

तुम्ही काल पाहिलं असेल की अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण हे सर्वजण माझ्यासोबत फॉर्म भरण्यासाठी आले होते. त्यामुळं आमच्यामध्ये नक्की कुठली गटबाजी आहे हे कळत नाहीए. ते फक्त मीडिया दाखवतंय की भाजपचं दाखवतंय आम्हाला माहिती नाही.

हे ही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

गैरसमज दूर करण्यासाठी बोलावली कार्यकारिणी बैठक

शिक्षक आणि पदवीधर मतदार संघात काँग्रेसचं टार्गेट होतं पण जनतेनं काँग्रेसला कौल दिला. बाळासाहेब थोरात यांनी विधीमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याची मला कुठलीही माहिती नाही. त्यांचा आज वाढदिवस आहे त्यामुळं मी ट्विट करुन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. बाळासाहेब थोरात आमचे विधीमंडळाचे नेते आहेत.

जर त्यांच्यामध्ये काही गैरसमज झालेला असेल तर त्यांच्याशी चर्चा करण्यासही आम्हाला काहीही हरकत नाही. त्यासाठी आम्ही १५ तारखेला कार्यकारिणीची बैठक बोलवली आहे. हा कार्यकारिणीचा इश्यू नाही, मीडियाच त्याला हवा बनवत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : ''सुनीतासारखी बायको मिळाल्याबद्दल देवाचे आभार मानतो, माझ्यासारख्या...'' अरविंद केजरीवाल नेमकं काय म्हणाले?

Shikhar Dhawan Retirement: क्रिकेटला करणार गुडबाय? दुखापतीवर अपडेट देत शिखर धवन स्पष्टच बोलला...

Aishwarya Narkar: "हे तुम्हाला शोभतं का? असं म्हणू नका!"; ट्रोल करणाऱ्यांना ऐश्वर्या नारकरचं सडेतोड उत्तर

Pune Porsche Accident: पुणे अपघात प्रकरणातील विशाल अग्रवालसह इतरांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामीनाचा अर्ज मोकळा

Latest Marathi News Live Update : पुणे कार अपघात प्रकरणी आरोपींचा जामिनासाठी अर्ज दाखल

SCROLL FOR NEXT