महाराष्ट्र बातम्या

एकही पत्रकार परिषद न घेण्याचा मोदींचा गुण मला सर्वांत जास्त आवडतो: प्रीतम मुंडे

सकाळ डिजिटल टीम

बीड: भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी आज पंतप्रधान मोदीजींचं कौतुक करताना त्यांच्या एकही पत्रकार परिषद ने घेण्याच्या गुणाचं कौतुक केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रीतम मुंडे यांनी बीड राष्ट्रवादीच्या नेत्यांसह राज्य सरकारवर चांगलाच निशाना साधला आहे. त्या म्हणाल्या, की आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त, मी आपल्या आवाहन करू इच्छिते, अतिशय भ्रष्ट असणाऱ्या या राष्ट्रवादीच्या विळख्यातून, आपण आपल्या बीड जिल्ह्याला मुक्तीकडे नेऊ. असा सणसणीत संकल्परूपी निशाणा खासदार प्रीतम मुंडे यांनी नाव न घेता धनंजय मुंडेंसह राष्ट्रवादीच्या नेत्यांवर साधला आहे.

त्या म्हणाल्या की, पंतप्रधान मोदीजींचा आजवरचा सगळ्या आवडता माझा गुण म्हणजे गेल्या 7 वर्षांत त्यांनी एकदाही पत्रकार परिषद घेतली नाही. पत्रकार परिषद घेतली नाही, याविषयी त्यांच्यावर टीका देखील होते. पण जो माणूस आपलं काम, आपलं ध्येय स्पष्ट समोर असताना काम करत राहतो, आपल्या मार्गावरती तो मार्गक्रमण करत राहतो. त्यावेळी त्याच्याबद्दल चांगलं बोलणारे जर 10 लोकं असतील तर टीका करणारेही दोन लोकं असतात. पण त्या टीकेने विचलीत न होता, आपण आपलं काम करत राहणं महत्त्वाचं असतं, असं त्या म्हणाल्या.

त्यांनी पुढे नाव न घेता धनंजय मुंडेंसह स्थानिक आमदारांचा देखील चांगलाच समाचार घेतला आहे. त्या म्हणाल्या की, "कोण रस्त्याच्या कामाचा पाठपुरावा करत आहे, हे सगळ्यांना माहीत आहे. उगीचच कॉन्ट्रॅक्टरला हाताशी धरायचं आणि आपणच काम केल्याचा आव आणायचा. याचा एक नवीन प्रयोग जिल्ह्यात सुरू झाला आहे. बातम्या काढतात, या नॅशनल हायवेचा भूमिपूजन सोहळा थाटात संपन्न. मात्र जो रस्ता यांच्या अधीपत्त्यात येत नाही त्या रस्त्याच्या बातम्या येतात. याउलट श्रेय घेणारे आमदार भाजपचे असते तर मी समजून घेतले असते.

मात्र, राष्ट्रवादीचे हे आमदार केंद्रात सत्ता भाजपची आणि रस्त्यावर खड्डे पडले, की म्हणतात खासदारांना विचारा आणि दुरुस्तीचा निधी आला की म्हणतात आम्ही आणला. अशा दोन्ही बाजूने बोलणाऱ्या लोकांना, जनता त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही. असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : दिल्ली पोलिसांकडून 'एक्सपायर्ड' अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर? व्हायरल व्हिडिओमुळे खळबळ

Commonwealth Games 2026: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी ५३ कोटींचा खर्च; क्रीडा मंत्रालयाकडून ॲथलेटिक्स, बॉक्सिंगला प्राधान्य

'देशविरोधी शक्तींनी आंदोलन हायजॅक करू नये' दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर प्रीती झिंटा म्हणाली...'आंदोलनाचा गैरफायदा घेऊ नका'

Live Updates Marathi : महादेव जानकर, राजू शेट्टींनी घेतली आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट

Amravati News: शासकीय योजनेतील विहीर गेली चोरीला; गावकऱ्यांची पोलिस ठाण्यात धाव

SCROLL FOR NEXT