sharad pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : मी सत्तेची कोणतीही जबाबदारी घेणार नाही, शरद पवारांच मोठं विधान

खुद्द शरद पवारांनीच पंतप्रधान व्हायच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

धनश्री ओतारी

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मी सत्तेची कोणतीही जबाबदारी घेणार नाही असे मोठं विधान केलं आहे. त्यामुळे शरद पवार पंतप्रधान होणार या चर्चेला पुर्णविराम लागला आहे.(i will not become pm at the age of 82 says sharad pawar)

एका कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी पंतप्रधान पद आणि महाविकासआघाडी एकत्र निवडणुक लढण्यासंदर्भात भाष्य केलं आहे.

महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यास शरद पवार यांचं मोठा वाटा होता. त्यामुळे आता शिवसेना फुटल्यानंतर महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर तीन पक्षांच्या आघाडीचं काय होणार हा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होता आहे. दरम्यान, शरद पवारांनी मी सत्तेची कोणतीही जबाबदारी घेणार नाही असे म्हटले आहे.

काय म्हणाले शरद पवार?

मी कोणत्याही प्रकारे सत्तेत सहभागी होणार नाही, तसंच सत्तेची जबाबदारीही घेणार नाही. मोरारजी देसाईप्रमाणे मी ८२ व्या वर्षी पंतप्रधान होणार नाही. ८२ व्या वर्षी पंतप्रधान होण्याचा कित्ता मी गिरवणार नाही. असे स्पष्ट विधान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलं आहे.

तसेच, आगामी निवडणुका महाविकासआघाडी म्हणून एकत्र लढावी, असं आमचं मत आहे, पण त्यावर निर्णय झालेला नाही. आम्ही एकत्र निवडणुकीला सामोरं जावं का याची चाचपणी करत आहोत, पण अजूनही निर्णय झालेला नाही. समविचारी पक्षांनी एकत्र यायला हवं, असं माझं मत आहे, असंही पवार म्हणाले

सामन्यांची प्रश्न सोडवण्यासाठी विवध लोकांना एकत्र आणण्याचे सुख माझ्या वाटेला असाव अस विधानही त्यांनी यावेळी केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Numerology: स्वतःचेच रील्स पुन्हा पुन्हा पाहतात 'या' मूलांकांचे लोक! पाहा कोणत्या तारखेला जन्मलेले लोक असतात 'सेल्फ लव्हर'...

Sugarcane Crushing Season : १५ ऑक्टोबरपासूनचा गाळप हंगामाचा निर्णय रद्द करावा; विविध संघटनांची साखर आयुक्तांकडे मागणी

Kokan Railway : पाच वर्षांत कोकण रेल्वेवर रोज १०० हून अधिक गाड्या; दुपदरीकरणाला वेग, २२ सप्टेंबरला कोकण रेल्वे होणार कर्जमुक्त

Mumbai High Court : घटस्फोटाच्या निकालाला स्थगिती असताना पत्नीला घराबाहेर काढता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

सिनेसृष्टीला धक्का! 'वेलकम' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५६व्या वर्षी निधन; 15 दिवसांपासून होते इस्पितळात

SCROLL FOR NEXT