Pooja Khedkar esakal
महाराष्ट्र बातम्या

Pooja Khedkar: IAS पूजा खेडकर प्रकरणात रोहित पवारांनी उठवला आवाज; म्हणाले, कागदपत्रांची फेरफार करुन...

Rohit Pawar on Pooja Khedkar: पूजा खेडकर यांची पुण्यातून तडकाफडकी वाशिमला बदली करण्यात आली आहे. पूजा खेडकर आता वाशिमच्या जिल्हाधिकारी असणार आहेत. पूजा खेडकरबाबत अनेक नवे खुलासे समोर येत आहेत. त्यापैकी एक म्हणजे त्यांच्याकडे मोठी संपत्ती असल्याची माहिती समोर आली आहे.

संतोष कानडे

Trainee IAS officer Pooja Khedkar : प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे एकामागोमाग एक कारनामे पुढे येत आहेत. आधी गाडीचं प्रकरण, नंतर संपत्तीचं प्रकरण, त्यानंतर नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र आणि आता दिव्यांग प्रमाणपत्र; शासनाची फसवणूक करुन नोकरी मिळवल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे.

याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, पूजा खेडकर प्रकरणात शासनाने शहनिशा करावी. सामान्य कुटुंबातील मुलं खूप कष्ट घेतात, तरीही त्यांना सरकारी नोकर भरतीमध्ये संधी मिळत नाही. मात्र काही लोक कागदपंत्राची फेरफार करून अधिकारी झाले असतील आणि तसे रिपोर्ट्स असतील तर सरकारने याबाबत लक्ष घालावं. या प्रकरणात योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केलीय.

दरम्यान,पूजा खेडकर यांची पुण्यातून तडकाफडकी वाशिमला बदली करण्यात आली आहे. पूजा खेडकर आता वाशिमच्या जिल्हाधिकारी असणार आहेत. पूजा खेडकरबाबत अनेक नवे खुलासे समोर येत आहेत. त्यापैकी एक म्हणजे त्यांच्याकडे मोठी संपत्ती असल्याची माहिती समोर आली आहे.

तरीही पूजा खेडकर यांनी ओबीसी आरक्षणाला लाभ घेऊन नोकरी मिळवल्याचं सांगितलं जातंय. मात्र पूजा यांचं वार्षिक उत्पन्न ४२ लाख रूपये असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडे १७ कोटींहून आधिकची संपत्ती असल्याचं सांगितलं जातंय.

प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकरने २०२१ मध्ये UPSC परिक्षा उत्तीर्ण केली. या परिक्षेत त्यांचा रँक ८२१ होता. तिने स्वत:ला दिव्यांग घोषित केले असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यात कारनामे केल्याने त्यांची वाशिमला बदली करण्यात आलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला शिक्षकाकडून बेदम मारहाण; जिल्हा परिषद शाळेतील संतप्त प्रकार, प्रकरण दडपण्याचा प्रयत्न

Junnar Crime : लग्नास नकार; जुन्नरमध्ये विद्यार्थिनीवर तरुणाचा कोयत्याने हल्ला, विद्यार्थिनी गंभीर जखमी

Hardik Pandya: हार्दिक पांड्याविरोधात पुणे पोलिसात तक्रार; तिरंग्याचा अवमान केल्याचा आरोप

Cyber Crime : दहा कोटींच्या सायबर फसवणूकप्रकरणी सोलापूरमधून आरोपीला अटक

Monalisa Marriage: मुस्लिम तरुणासोबत लग्न केलं; पण वडिलांची भीती, घाबरलेल्या मोनालिसाची पोलिसात धाव अन्... व्हायरल गर्ल पुन्हा चर्चत

SCROLL FOR NEXT