Pooja Khedkar  esakal
महाराष्ट्र बातम्या

Pooja Khedkar : वादग्रस्त IAS पूजा खेडकर वाशिममध्ये रुजू; आरोपांवर एका वाक्यात दिली प्रतिक्रिया

Washim Collector : जिल्हाधिकारी बुवनेश्वरी म्हणाल्या की, पूजा खेडकर ह्या 2023 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. आज त्या वाशिममध्ये रुजू झाल्या. जीएडीच्या शेडूलप्रमाणे त्यांना ट्रेनिंग देण्यासाठी आम्ही तयार आहोत.

संतोष कानडे

IAS Pooja Khedkar News : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची पुण्यातून वाशिम येथे बदली झाली आहे. गुरुवारी त्या वाशिममध्ये रुजू झाल्या. होणाऱ्या आरोपांवर त्यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे.

पूजा खेडकर ह्या गुरुवारी वाशिममध्ये हजर झाल्या. त्यांनी वाशिमच्या जिल्हाधिकारी बुवनेश्वरी यांची भेट घेतली. मीडियातून होत असलेल्या आरोपावर बोलण्यास त्यांनी नकार दिला. ''आरोपाबद्दल बोलण्यासाठी मी ऑथराईज नाही.'' एवढंच स्पष्टीकरण पूजा खेडकर यांनी दिलं.

''वाशिममध्ये रुजू झाल्याचा आनंद आहे.. पुढील वर्षभर काम करत राहीन.'' असंही खेडकर म्हणाल्या. त्यानंतर वाशिमच्या जिल्हाधिकारी बुवनेश्वरी यांनीही पत्रकारांशी संवाद साधल्या.

जिल्हाधिकारी बुवनेश्वरी म्हणाल्या की, पूजा खेडकर ह्या 2023 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. आज त्या वाशिममध्ये रुजू झाल्या. जीएडीच्या शेडूलप्रमाणे त्यांना ट्रेनिंग देण्यासाठी आम्ही तयार आहोत.

मिळालेल्या माहितीनुसार, पूजा खेडकर यांच्या वडिलांनी वंचित बहुजन आघाडीच्या तिकीटावर अहमदनगर लोकसभा निवडणूक लढवली होती. पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी खेडकर यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला आहे. त्यांनी सांगितलं की, पूजा यांचे वडील दिलीप खेडकर यांनी लोकसभा लढवली होती. त्यांची एकूण संपत्ती ४० कोटी इतकी आगे. त्यांचे वार्षिक उत्पन्न ४९ लाख आहे.

दुसरीकडे पूजा खेडकर यांनी अपंग व्यक्तीच्या कोट्यातून नियुक्ती मिळवली आहे. तसेच, त्यांनी ओबीसी नॉन क्रिमीलीयर सर्टिफिकेटचा फायदा घेतल्याचं सांगण्यात येतंय. पूजा खेडकर यांचे वडील हे प्रदूषण नियंत्रण मंडळातील निवृत्त सरकारी अधिकारी होते. नॉन क्रिमीलीयरची मर्यादा ८ लाखांची आहे. वडिलांचे वार्षिक उत्पन्न ४९ लाख असताना नॉन क्रिमीलीयर सर्टिफिकेटचा फायदा घेतल्याचा पूजा खेडकर यांच्यावर आरोप आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Voter List: राज्यात एक कोटी मतदार वगळणार ? 'एसआयआर'मध्ये मुंबई, ठाणे, पुण्यात सर्वाधिक मतदार बाद होण्याचा अंदाज!

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात सलग दोन दिवस घसरण, आजचे भाव काय?

१३५च्या स्पीडनं स्विफ्टची ट्रकला मागून धडक, अख्खं कुटुंब संपलं; पाच जणांचा जागीच मृत्यू

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भाला पाऊस; हवामान विभागाचा अंदाज

बुमराला अचानक विश्रांती का? अफगाणिस्तान मालिकेपूर्वी BCCI चा मोठा मास्टरप्लॅन समोर!

SCROLL FOR NEXT