Manorama Khedkar Parents Absconding Esakal
महाराष्ट्र बातम्या

IAS Pooja Khedkar: "पूजा खेडकरचे आई-वडील फरार, फोनही बंद," पोलिसांनी आणखी काय काय खुलासे केले?

Pooja Khedkar Case: पूजानंतर आता तिचे आई-वडील अडचणीत आले आहेत. त्यांच्यावर स्थानिक शेतकऱ्याला धमकावल्याचा आरोप आहे. पुणे पोलिसांनी त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.

आशुतोष मसगौंडे

प्रशिक्षणार्थ आयएएस अधिकारी पूजा खेडकर हे नाव सध्या देशभर चर्चेत आहे. या प्रकरणात आता आणखी एक नवीन बाब समोर आली आहे.

पूजानंतर आता तिचे आई-वडील अडचणीत आले आहेत. त्यांच्यावर स्थानिक शेतकऱ्याला धमकावल्याचा आरोप आहे. पुणे पोलिसांनी त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांनी सांगितले की, "आरोपी फरार आहेत. आम्ही त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र, अद्याप संपर्क झालेला नाही. त्यांचे फोन बंद आहेत. पोलीस त्यांच्या घरीही गेले होते, पण ते तिथे हजर नव्हते."

देशमुख पुढे म्हणाले की, "स्थानिक गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांसह अनेक पथके पुणे आणि परिसरात त्यांचा शोध घेत आहेत. या लोकांची काही फार्महाऊस आणि इतर निवासस्थाने येथे आहेत. आम्ही त्यांना तेथे शोधत आहोत आरोपी सापडल्यानंतर त्यांची चौकशी केली जाईल."

2023 बॅचच्या पूजा खेडकरवर पुण्यात प्रोबेशन IAS अधिकारी म्हणून काम करताना पदाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. खेडकरने अनेक विशेषाधिकारांची मागणी केल्याचे सांगितले जात आहे जे प्रोबेशन अधिकाऱ्यांना मिळत नाही. IAS पूजाने तिची वैयक्तिक ऑडी कार वापरायची, त्याच्यावर महाराष्ट्र सरकारचे स्टिकर आणि लाल दिवा देखील लावलेला असायचा. आयएएस खेडकरने वाहनावर विनापरवाना लाल दिवा आणि महाराष्ट्र शासनाचा उल्लेख केल्याबद्दल ज्या कंपनीच्या नावावर गाडी होती, त्या कंपनीला पुणे शहर वाहतूक पोलिसांकडून नोटीस देण्यात आली आहे. पोलीस तपासात ही आलिशान ऑडी कार एका खाजगी अभियांत्रिकी कंपनीच्या नावाने नोंदणीकृत असल्याचे निष्पन्न झाले. कंपनीच्या या वाहनावर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याच्या २१ तक्रारी असून, २७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मात्र पुणे पोलिसांनी आजवर कारवाई का केली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

चौकशीसाठी समिती

प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकरवरील आरोपांची चौकशी करण्यासाठी केंद्राने एक सदस्यीय समिती स्थापन केली आहे. प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून तिची नियुक्ती आणि वर्तणूक यावरून ती वादात सापडली आहे.

वरिष्ठ अतिरिक्त सचिव स्तरावरील अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखालील या समितीला पुढील दोन आठवड्यांत खेडकर यांचे दावे आणि पार्श्वभूमी पडताळून पाहण्याचे काम देण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT