Aurangabad Divisional Commissioner Sunil Kendrekar sakal
महाराष्ट्र बातम्या

IAS Sunil Kendrekar : धडाकेबाज IAS केंद्रेकर स्वेच्छानिवृत्ती नंतर काय करणार ? राजकारणात एंट्री की शेती

भूमिपुत्राच्या स्वेच्छानिवृत्तीची परभणी जिल्ह्यात चर्चा

राजेश नागरे

परभणी : प्रशासनावर पकड असणारे, नियम, कायद्याची काटेकोरपणे पालन करणारे, क्षेत्र कोणतेही असो कायम विकासासाठी झटणारे आणि सर्वसामान्यांना आपलेसे वाटणारे जिल्ह्याचे भूमिपुत्र, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली. त्याची चर्चा जिल्हाभर रंगली आहे. निवृत्तीनंतर अध्यात्म आणि शेती-मातीत रमणार असल्याचे केंद्रेकरांनी सांगितले. पण, निवृत्तीनंतरही ते स्वस्थ बसणार नसल्याची चर्चा असून ते आता सेकंड इनिंगमध्ये काय करणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यातून अनेक अधिकारी प्रशासकीय सेवेत आहेत. यापुढेही जातील. पण, राज्यात, देशात आपल्या कार्याने, धडाकेबाज निर्णयांनी जिल्ह्याची पताका फडकावली ती केंद्रेकरांनी. आपल्या पदाचा, अधिकाराचा सर्वसामान्यांच्या हितासाठी वापर करणाऱ्या, प्रसंगी यंत्रणेशी लढणाऱ्या मोजक्या अधिकाऱ्यांमध्ये केंद्रेकरांचा समावेश होतो.

विविध विभागात कार्य करीत असताना त्यांचे अनेक निर्णय वादळी ठरले. परंतु त्या निर्णयांना जनतेचा पाठिंबा होता, हेही अनेक वेळा दिसून आले आहे. एक अभियांत्रिकी प्राध्यापक, गटविकास अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशी पदे भूषविल्यानंतर ते आयएएस अधिकारी झाले. या प्रशासकीय सेवेत त्यांनी जिल्हाधिकारी, विक्रीकर आयुक्त, कृषी आयुक्त, क्रीडा आयुक्त, मनपा आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी, सिडकोचे मुख्य प्रशासक या पदावर कार्य केले. आता ते विभागीय आयुक्तपदावर आहेत.

असा आहे जीवनप्रवास

शहरापासून जवळच असलेल्या झरी गावचे मूळ निवासी असलेले केंद्रेकर यांचा बालपण व शिक्षण परभणीतच झाले. त्यांचे वडील मधुकरराव केंद्रेकर हे जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक होते तर आई गृहिणी. पहिली ते दहावीपर्यंत येथील बाल विद्या मंदिरात शिक्षण झाल्यानंतर शिवाजी महाविद्यालयात त्यांनी अकरावी व बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेतले.

छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली. स्पर्धा परीक्षेच्या तयारी करताना एका अॅटो कंपनीत काम केले. दरम्यान, एका अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणूनही अध्यापनाचे कार्य केले आहे.

जिल्ह्याच्या विकासाकडे लक्ष

केंद्रेकर यांनी नेहमीच आपल्या पदाला व अधिकाराला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. बीड जिल्ह्यात जिल्हाधिकारी असताना त्यांची कारकीर्द गाजली. त्यांची बदली झाल्यानंतर ती रद्द होण्यासाठी लोकांनी केलेले उठाव राज्यभर गाजला. शासनालाही त्यांची बदली रद्द करावी लागली होती. असे हे अधिकारी राज्यात कुठेही असले तरी आपल्या जन्मभूमीला मात्र कधी विसरले नाहीत. परभणीचा विकास कसा होईल याकडे त्यांचे कायम लक्ष राहिले आहे.

परभणी शहराच्या पाणी पुरवठा योजना, भूमिगत गटार योजना मार्गी लावण्यात, क्रीडा संकुलासाठी कृषी विद्यापीठाची जागा मिळवून देण्यासह अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले. वैद्यकीय महाविद्यालयासाठीही त्यांना प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा केला

अध्यात्म अन् समाजसेवेला वाहून घेणार

केंद्रेकर यांना शेती व व्यायामाची प्रचंड आवड आहे. विद्यार्थी दशेपासून आजतागायत त्यांनी व्यायामाचा शिरस्ता अभावानेच मोडल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या वयातही त्यांचे फिजीकल फिटनेस युवकांना लाजवणारे आहे. रोज धावणे यासह अन्य व्यायाम प्रकार, ध्यान धारणेसाठी ते जाणीवपूर्वक वेळ देतात. शेतीची व विशेषतः

शेतात काम करण्याची त्यांना विशेष आवड आहे. झरी येथील आपल्या शेतातही ते सुटीमध्ये फावल्या वेळात काम करतात. स्वेच्छानिवृत्तीनंतर शेतीत रमणार असल्याचे केंद्रेकर यांनी विश्‍वासू मित्रांकडे सांगितले. शेती करायला मला आवडते, त्यामुळे यापुढचा सर्वाधिक काळ हा शेतीमध्ये नवनवे प्रयोग करण्यात घालवणार आहे.

या शिवाय अध्यात्मात देखील रमणार आहे. प्रशासकीय सेवेत काम करताना कायम सर्वसामान्यांच्या हिताचा ध्यास घेऊन काम केले. त्यामुळे निवृत्तीनंतर देखील शेती, अध्यात्मासोबतच समाजसेवेला माझे प्राधान्य असेल, असे केंद्रकरांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Clash: मिरजेत दोन गटात राडा; तणाव नियंत्रणात, स्वतः एसपी उतरले रस्त्यावर

Himachal Pradesh Bus Landslide : हिमाचल प्रदेशातील बिलासपूरमध्ये भीषण दुर्घटना; बसवर दरड कोसळून १८ जणांचा मृत्यू!

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीची आत्महत्या! वडील महावितरणमध्ये वरिष्ठ अधिकारी; अभ्यासात हुशार, घरची स्थिती चांगली, बहीणही मेडिकललाच, तरी केली उचलले टोकाचे पाऊल

विद्यापीठाच्या युवा महोत्सवात मानपानावरून कुलगुरुंसमवेत वाद; स्टेजवर बोलावून मानमान न दिल्याने अधिसभा व व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सत्कार न स्विकारताच परतले

मोठी ब्रेकिंग! सोलापुरातील समर्थ सहकारी बॅंकेच्या व्यवहारावर ‘आरबीआय’चे निर्बंध; काय आहेत निर्बंध, वाचा...

SCROLL FOR NEXT