Pooja khedkar father dilip khedkar 
महाराष्ट्र बातम्या

IAS Pooja Khedkar: 'धोंडीबाचं कोंडीबा केलं अन् बारामतीत... पूजा खेडकर कुटुंबाचा आणखी एक कारनामा उघड

Pooja khedkar father dilip khedkar: पूजा यांचे वडील दिलीप खेडकर यांनी बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथे असलेली 14 गुंठे जमीन खरेदी केली होती.

कार्तिक पुजारी

मुंबई- वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या कुटुंबाचा आणखी एक कारनामा उघड झाला आहे. पूजा यांचे वडील दिलीप खेडकर यांनी बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथे असलेली 14 गुंठे जमीन खरेदी केली होती. यात सातबाऱ्यातील आपल्या नावातील वडिलांचे नाव त्यांनी बदलले आहे. दिलीप धोंडीबा खेडकर ऐवजी आता नवीन नाव दिलीप कोंडीबा खेडकर असा बदल केला आहे.

दिलीप कोंडीबा खेडकर यांनी 14 वर्षांपूर्वी ही जमीन खरेदी केली आहे. त्याचा सातबारा ही उपलब्ध आहे. वागळवाडी येथे दिलीप खेडकर यांची 14 गुंठे जमीन असल्याचे पुण्याचे आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी उघड केले होते. ही जमीन विक्री करायची असल्याने त्या ठिकाणी खेडकर कुटुंबीयांनी तसा बोर्ड लावला आहे. दीड कोटी जमिनीची किंमत असल्याचे सांगितले जात आहे. आता सातबाऱ्यावर नव्याने नाव कोंडीबा केले आहे

पूजा खेडकर यांना कारणे दाखवा नोटीस

पूजा खेडकर यांना डिपार्टमेंट ऑफ परसोनेल अँड ट्रेनिंग विभागाकडून कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. २ ऑगस्ट पर्यंत नोटीसवर उत्तरं देण्याचे आदेश देण्यात आले आहे.याप्रकरणी पूजा खेडकर यांच्या ईमेल तसेच रहिवासी पत्त्यावर नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती आहे.

मसुरी येथील लाल बहादुर शास्त्री ट्रेनिंग अकादमी मध्ये हजर राहण्याचे आदेश पूजा खेडकर यांना बजावले गेले होते. मात्र त्याठिकाणी सुद्धा त्या हजर झालेल्या नाहीत. दुसऱ्या बाजूला, दिल्ली पोलिसांनी पूजा खेडकर यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.पूजा खेडकर अद्याप "नॉट रिचेबल" आहेत.

पूजा खेडकर यांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

IAS पूजा खेडकर यांचा दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टासमोर अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. याप्रकरणी आज कोर्टात सुनावणी होणार आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश देवेंद्र कुमार जंगला यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. कोर्ट काय निर्णय घेतलं हे पाहावं लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या भावात मोठा बदल, जाणून घ्या काय आहे आजची किंमत ?

Dhurandhar Trailer Launch : रणवीरच्या ‘धुरंधर’चा ट्रेलर येतोय!

बिहारमध्ये नव्या सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त अन् ठिकाण ठरलं, पंतप्रधान मोदी राहणार उपस्थित

Latest Marathi Breaking News : 'नुकतेच स्थापन झालेल्या सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण केली पाहिजेत'- उद्योगपती रॉबर्ट वड्रा

Suhana Swasthyam 2025 : ‘फूडफार्मर’ रेवंत यांचे ‘स्वास्थ्यम्’मध्ये व्याख्यान; खाद्यपदार्थांवरील लेबल्स वाचायचे कसे, हे कळणार सोप्या शब्दांत

SCROLL FOR NEXT