IAS तुकाराम मुंढे

 

sakal solapur

महाराष्ट्र बातम्या

तुकाराम मुंढे यांची धास्ती! अन्न व औषध प्रशासनाचा चार्ज घेताच गुटखा-मावा विक्रेत्यांसह भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले, ११ दिवसांत ९ गुन्हे दाखल

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या ११ दिवसांत सोलापूर जिल्ह्यात अन्न-औषध प्रशासनाच्या कारवायांना वेग आला आहे. २५ मे ते ५ जून या कालावधीत ५० तपासण्या करून ९ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. कमी कालावधीत झालेल्या या कारवायांमुळे विभाग अधिक सतर्क झाल्याचे चित्र दिसत आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या ११ दिवसांत सोलापूर जिल्ह्यात अन्न-औषध प्रशासनाच्या कारवायांना वेग आला आहे. २५ मे ते ५ जून या कालावधीत ५० तपासण्या करून ९ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. कमी कालावधीत झालेल्या या कारवायांमुळे विभाग अधिक सतर्क झाल्याचे चित्र दिसत आहे. मे महिन्यात जिल्ह्यात ७७ तपासण्या, ६९ नमुने संकलन आणि १४ गुन्ह्यांची नोंद झाली होती. मात्र मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या ११ दिवसांतच ५० तपासण्या झाल्याने कारवाईचा वेग वाढल्याची चर्चा सुरू झाली आहे.

अन्न पदार्थ विक्रेते, हॉटेल व्यावसायिक आणि भेसळ करणाऱ्यांमध्येही या कारवायांमुळे सावधगिरीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दूध भेसळीचा प्रश्न गंभीर बनला आहे. जिल्ह्यात दररोज सुमारे २५ लाख लिटर दूध उत्पादन होत असून सांगोला, माढा, पंढरपूर, मोहोळ आणि माळशिरस तालुक्यांत भेसळीच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. तुकाराम मुंढे हे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे सचिव असताना दूध भेसळीविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली होती. त्यामुळे आता अन्न व औषध प्रशासनाच्या माध्यमातूनही या प्रकारांवर प्रभावी कारवाई होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

दुसरीकडे, सोलापूर शहरात मावा विक्री आणि गुटख्याचा प्रश्न कायम आहे. राज्यात गुटखाबंदी असली तरी कर्नाटक आणि तेलंगणमधून गुटखा सोलापूर जिल्ह्यात पोचत असल्याचे चित्र आहे. मावा आणि गुटखा विक्रीविरोधात अधिक प्रभावी मोहीम राबविली जावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. आषाढी वारी अवघ्या काही आठवड्यांवर येऊन ठेपली आहे. लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत अन्न सुरक्षा, दूध भेसळ, मावा आणि गुटखा विक्रीविरोधात विशेष मोहीम राबविली जाते का, याकडे आता सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे.

सोलापूरशी मुंढेंचे जुने नाते

तुकाराम मुंढे यांनी प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी म्हणून कारकीर्दीच्या सुरवातीच्या काळात सोलापूर जिल्ह्यात काम केले आहे. त्यानंतर नोव्हेंबर २०१४ ते मे २०१६ या कालावधीत त्यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले. जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयालगतचा आपत्कालीन रस्ता खुला करणे तसेच पंढरपूर आषाढी यात्रेसाठी ६५ एकर सुविधा क्षेत्र विकसित करण्यासारख्या निर्णयांमुळे त्यांची कार्यशैली चर्चेत आली होती.

आकडे बोलतात...

  • अन्न प्रशासनाची कामगिरी

  • एप्रिल २०२६

  • तपासणी : ४२

  • नमुने : ३८

  • जप्त साठा : १ लाख ३५ हजार ४२९

  • गुन्हे दाखल : १०

  • ----------------------------------------

२४ मे २०२६

  • तपासणी : ७७

  • नमुने : ६९

  • जप्त साठा : ३० लाख ९७ हजार ९९५

  • गुन्हे दाखल : १४

  • ---------------------------------------------

तुकाराम मुंढे रुजू झाल्यापासून (२५ मे ५ जून)

  • तपासणी : ५०

  • जप्त साठा : ३ लाख २२ हजार ८८४

  • दाखल गुन्हे : ९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price Today : कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा वाढ ! पेट्रोल-डिझेलच्या दरातही बदल ? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे ताजे दर

Nagpur News: संघ मुख्यालयबाबत आक्षेपार्ह पोस्ट; युजरविरोधात कोतवाली ठाण्यात गुन्हा दाखल

Latest Marathi News Update : शिंदेंच्या नेत्याचा अपघाती मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखावर घातपाताचा आरोप

Farmer Loan Waiver : कोल्हापुरात २३ हजार ३१६ शेतकऱ्यांना कर्जमाफी, पहिल्या टप्प्यातील लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध

IND vs ZIM 2nd T20I : फक्त ४ धावा अन् तिलक वर्मा जाऊन बसला रोहित शर्मा, विराट कोहलीसह 'त्या' ८ जणांच्या स्पेशल लिस्टमध्ये

SCROLL FOR NEXT