Identified, who are the 13 dead maharashtra bhushan award ceremony 
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Bhushan: उष्मघाताने मृत्यू झालेले 13 श्री सदस्य कोण? ओळख पटली

खारघर येथे 16 एप्रिल रोजी पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यात मोठी दुर्घटना घडली.

धनश्री ओतारी

खारघर येथे 16 एप्रिल रोजी पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यात मोठी दुर्घटना घडली. उष्मघाताने 13 श्री सदस्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्यात राजकारण चांगलंच तापलं आहे. दरम्यान, मृत्यू झालेल्या काही श्री सदस्यांची नावे जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर आता उर्वरित मृत श्री सदस्यांची ओळख पटली असून, त्यांनी नावे प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहेत.(Identified who are the 13 dead maharashtra bhushan award ceremony)

मृत्यू झालेल्या 13 श्री सदस्यांमध्ये 9 महिला व 4 पुरुष आहेत. तर 12 व्यक्ती रुग्णालयात दाखल असून, त्यांच्यावर आवश्यक उपचार सुरू आहेत. 35 व्यक्तींना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

मृत्यू झालेल्यांची नावे

1) तुळशिराम भाऊ वागड

2) जयश्री जगन्नाथ पाटील

3) महेश नारायण गायकर

4) कलावती सिद्धराम वायचाळ

5) मंजूषा कृष्णा भोंबडे

6) भीमा कृष्णा साळवी

7) सविता संजय पवार

8) स्वप्नील सदाशिव केणी

9) पुष्पा मदन गायकर

10) वंदना जगन्नाथ पाटील

11) मिनाक्षी मोहन मेस्त्री

12) गुलाब बबन पाटील

13) विनायक हळदणकर

निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिला जाणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार 16 एप्रिल रोजी प्रदान करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते अप्पासाहेब धर्माधिकारी यांचा गौरव करण्यात आला. मात्र, उष्मघातामुळे या कार्यक्रमला गालबोट लागलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

SCROLL FOR NEXT