Eknath Shinde, Devendra Fadnavis and Ajit Pawar  Esakal
महाराष्ट्र बातम्या

OBC Non Creamy layer: नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र असल्यास उत्पनाच्या दाखल्याची गरज नाही; राज्य शासनाचा मोठा निर्णय

या आदेशाची लवकरच निघणार सरकारी अधिसूचना

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : ओबीसी वर्गाच्या उमेदवारांना यापुढं नॉन क्रिमीलेयर आणि उत्पन्नाचा दाखला अशा दोन्हीही प्रमाणपत्रांची गरज भासणार नाही. राज्य शासनानं याबाबतचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. लवकरच याची सरकारी अधिसूचना (जीआर) देखील काढण्यात येणार आहे. ओबीसी प्रश्नाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. (If have a non creamy layer certificate then no proof of income is required a big decision of Maharashtra Government)

सुत्रांच्या माहितीनुसार, ओबीसींना शिक्षणासाठी नॉन क्रीमिलेयर आणि उत्पन्नाचा दाखला अशी दोन्ही कागदपत्रे सादर करावी लागतात. पण आता यापुढं ही दोन्हीही कागदपत्रे एकाच वेळी सादर करण्याची गरज नाही. त्याऐवजी नॉन क्रिमी लेयर प्रमाणपत्र असल्यास आठ लाखांपर्यंत उत्पन्नाचा दाखला देण्याची गरज नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्राशासनाला याबाबत आदेश दिले आहेत.

दरम्यान, या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी लवकरच याबाबतची सर्व प्रक्रिया पूर्ण करुन जीआर काढण्यात येणार असल्याचंही ओबीसी प्रश्नांच्या बैठकीत स्पष्ट करण्यात आलं.

अजितदादांनी खोडून काढला भुजबळांचा मुद्दा

या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यामध्ये सरकारी नोकरीतील ओबीसींच्या आकडेवारीवरुन खडागंजी झाली. सरकारी नोकरीत ओबीसींना न्याय मिळत नसल्याची भूमिका यावेळी भुजबळांनी मांडली. मात्र, ऐन बैठकीत अजित पवारांनी आकडेवारी मागवल्यानं भुजबळांनी तात्पुरती माघार घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon News : जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात निवासी डॉक्टरवर रुग्णांच्या नातेवाइकांचा आक्रमक हल्ला

Dhanteras 2025: धनत्रयोदशीला सोनं किंवा चांदी खरेदी करू शकत नसाल, तर 'हे' स्वस्त उपाय केल्यास होईल धनप्राप्ती अन् माता लक्ष्मी होईल प्रसन्न

Natural sleep remedies : तुमच्या डोक्यात रात्री खूप विचार येतात का? ताण कमी करून शांत झोप येण्यासाठी 'हा' घरगुती उपाय नक्की करा

Latest Marathi News Live Update: नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात जंगल सफरीला सुरवात

Election Preparations 2025: पहिला गुलाल झेडपीचा की नगरपरिषदांचा? दिवाळीनंतर उमेदवारी अर्जाला सुरुवात होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT