NCB Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

वानखेडेंविरोधात पुरावे असतील तर मलिकांनी कोर्टात जावं - NCB

नवाब मलिक यांनी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंवर आरोप केले आहेत.

सुधीर काकडे

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नवाब मलिक यांनी आजही असेच आरोप करत समीर वानखेडे आणि मोहित कंबोज यांच्याबद्दल काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यावर आता एनसीबीकने देखील नवाब मलिकांच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे.

नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेत नवाब समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले. आर्यन खान हा स्वत: तिकिट विकत घेऊन त्या पार्टीमध्ये गेला नव्हता, तर त्याला प्रतिक गाबा आणि अमीर फर्निचरवाला हे त्या पार्टीत घेऊन गेले होते. त्यानंतर आता एनसीबीने नवाब मलिक यांच्याकडे जर पुरावे असेल तर त्यांनी ते कोर्टात सादर करावे असं आवाहन केलं आहे. तसेच एनसीबीकडून असंही सांगण्यात आलंय की, वानखेडे आणि सॅम डिसोझा यांच्यात संपर्क नव्हता असं इंडिया टुडेच्या वृत्तामधून समोर आलं आहे.

दरम्यान, क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात सॅम डिसूझाचे नाव समोर आले आहे. के.पी. गोसावीचा अंगरक्षक असल्याचा दावा करणार्‍या प्रभाकर साईलने आरोप केला आहे की, आर्यन खानला या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी गोसावी आणि सॅम डिसोझा यांना २५ कोटी रुपयांच्या खंडणीबद्दल बोलताना ऐकले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT