NCP sharad Pawar sakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar: "गुजराल नाही, तर शरद पवारचं झाले असते देशाचे पंतप्रधान", मोठ्या नेत्याने सांगितला १९९६ मधील किस्सा

'शरद पवार १९९६ सालीच पंतप्रधान झाले असते..', मोठ्या नेत्याचा दावा

अंकिता खाणे (Ankita Khane)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील अशी चर्चा सातत्याने राजकीय वर्तुळात सातत्याने होताना दिसुन येतात. पण, शरद पवार यांनी वेळोवेळी याला चर्चेला पुर्णविराम दिला आहे. तराही अधून -मधून या चर्चा होत आहेत अशातच काँग्रेसचे नवे कार्यकारी अध्यक्ष, खासदार प्रफुल्ल पटेल यांनी मोठा दावा केला आहे. “एच. डी. देवगौडा यांच्यानंतर आय. के. गुजराल नाही तर शरद पवार देशाचे पंतप्रधान झाले असते,” असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हंटलं आहे. (Latest Marathi News)

“मला एका गोष्टीची खंत आहे. ही खंत शरद पवारांनाही आहे. 1996 साली देवगौडा यांचा पाठिंबा काँग्रेसच्यावतीने सीताराम केसरी यांनी काढून घेतला होता. तेव्हा काँग्रेसमध्ये अंतर्गत जे वातावरण होतं, त्यामुळे १०१ टक्के सर्व लोक शरद पवारांच्या पाठिशी उभे होते. त्यावेळी शरद पवार ठाम राहिले असते, तर देवगौडा यांच्यानंतर आय. के. गुजराल नाहीतर शरद पवारच देशाचे पंतप्रधान झाले असते,” असं प्रफुल्ल पटेलांनी म्हंटलं आहे. ते ‘एबीपी माझा’च्या ‘माझा कट्ट्या’वर बोलत होते.(Latest Marathi News)

पुढे बोलताना ते म्हणाले कि, तेव्हा आम्ही कुठेतरी कमी पडलो. लोकसभा निवडणुकीनंतर ११ महिन्यानंतर केसरी यांनी देवगौडा यांचा पाठिंबा काढून घेतला. त्यावेळी काँग्रेसची परिस्थितीही चांगली नव्हती. १४५ खासदार होते. तर, शरद पवार संसदीय नेते होते.

देवगौडा यांचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर अशी परिस्थिती निर्माण झाली की, निवडणूक लागण्याची शक्यता होती. तर लोकसभा निवडणुकीच्या ११ महिन्यानंतर कोणत्या खासदाराला लगेच निवडणूक परवडणार होती? अचानक निवडणुकीला सामोरे गेल्यावर खासदार आणि पक्ष निवडून येईल का? याबाबत शंका निर्माण झाली होती.

सीताराम केसरी यांनी अचानक पाठिंबा काढून घेतला. कारण, केसरी यांना वाटलं होतं, ते स्वत: पंतप्रधान होतील असं पटेल यांनी म्हटलं आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT