Priyanaka Gandhi and Narendra modi 
महाराष्ट्र बातम्या

Loksabha Election: लोकसभेला प्रियंका गांधी वाराणसीतून मोदींविरोधात नक्की विजयी होतील; ठाकरे गटाच्या नेत्याचं विधान

Shivsena News: प्रियांका गांधी वाड्रा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

रवींद्र देशमुख

Loksabha Election 2023- प्रियांका गांधी वाड्रा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. दोन दिवसांपूर्वीच त्यांचे पती, रॉबर्ट वढेरा यांनी नुकतेच म्हटले होते की, त्यांची पत्नी प्रियांका गांधी खूप चांगल्या खासदार सिद्ध होतील. त्यातच आता उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील प्रियांका गांधी यांच्या निवडणूक लढविण्यावर विधान केलं आहे.

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीतून आगामी लोकसभा निवडणूक लढवली तर त्या नक्कीच विजयी होतील, असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.

प्रियांका गांधी यांनी निवडणूक लढवण्याबाबत संजय राऊत यांना विचारले असता ते म्हणाले, वाराणसीच्या जनतेला प्रियांका गांधी हव्या आहेत. प्रियांका गांधी यांनी वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात निवडणूक लढवली तर त्या नक्कीच जिंकतील. त्यामुळे आगामी काळात भाजपसाठी रायबरेली, वाराणसी आणि अमेठीतील निवडणूक लढाई कठीण ठरू शकते, असंही राऊत यांनी म्हटलं.

त्याचवेळी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट होऊ शकते तर शरद पवार आणि अजित पवार का भेटू शकत नाहीत?, असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola Nazul Plot Action : मनपाच्या कारवाईला स्थगितीची मागणी ; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आयुक्तांना निर्देश नजूल भूखंडावरील रहिवासी, व्यावसायिकांना दिलासा; दोन्ही बाजू ऐकून घेण्याची शिवसेनेची मागणी

Madhya Pradesh: वर्षभरात ८५ हजार तरुणांना रोजगाराच्या संधी; ६२ खनिज निरीक्षकांना नियुक्तीपत्रे

'हे काय चाललंय आयुष्यात...' जितेंद्र जोशींनी नम्रता शिरोडकरबरोबरच्या कामाचा सांगितला अनुभव, म्हणाले, 'एक वेगळच दडपण...'

Latest Marathi News Live Update : पुण्यातील उद्योजक सचिन लोणकर यांच्यावर जीवघेणा हल्ला; हल्ल्यानंतर घटनास्थळावरून आरोपी फरार

IND vs SL Semi Final : झाला हो गाजावाजा,पण...! भारताची आघाडीची फळी ढेपाळली; वैभव सूर्यवंशी ठिक खेळला, संजू-अभिषेक फेल

SCROLL FOR NEXT