Bachchu Kadu  
महाराष्ट्र बातम्या

Bachchu Kadu : शरद पवार आले, तर अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात, पण आता...; बच्चू कडूंचं मोठं विधान

रवींद्र देशमुख

मुंबई - राज्याचं राजकारण सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि अजित पवार यांच्या अवतीभवती फिरत असल्याचं चित्र आहे. दोघांच्या गुप्त भेटीनंतर अनेक दावे करण्यात आले आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अजित पवारांनी शरद पवारांसमोर भाजपकडची ऑफर सांगितल्याचा दावा केला होता. त्याच दाव्यावर आता आमदार बच्चू कडू यांची प्रतिक्रिया आली आहे.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते की, शरद पवार यांना कृषीमंत्रीपद, सुप्रिया सुळेंना मंत्रीपद दिल्यानंतर अजित पवार यांना मुख्यमंत्रीपद मिळेल. त्यावर आता बच्चू कडू म्हणाले की, शरद पवार आमच्यासोबत आले तर अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात. मात्र तसं झालं तर सरकारचं वाटोळं होईल. एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने काम करतात, त्यामुळे कोणी आडवं येऊ नये, असही बच्चू कडू यांनी म्हटलं.

बच्चू कडू सध्या चर्चेत आहेत. आजच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नीने मंत्रीमंडळातील नेत्यांसाठी मुंबईत स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. मात्र या कार्यक्रमात बच्चू कडू यांना आमंत्रण देण्यात आलं नाही. त्यामुळे बच्चू कडू नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या.

दरम्यान बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांच्या कामाचं आज कौतुक केलं आहे. बच्चू कडू यांनी मंत्रीमंडळ विस्तारात डावललं आहे. त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा काही महिन्यांपूर्वी रंगल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Strait of Hormuz: 'होर्मुझ'चं सोडा, इराणची नवीनच खेळी; अरबी समुद्रापर्यंत ‘रेस्ट्रिक्टेड झोन’ करण्याची योजना, जगावर नवं संकट

SCROLL FOR NEXT