Sanjay Shirsat esakal
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Shirsat: निकाल शिंदेंच्या बाजूने आला तर...शिवसेना ठाकरेंच्या २ आमदारांना व्हिप देणार नाही; शिरसाटांचं मोठं वक्तव्य

Shivsena MLA Disqualification Case: शिंदेंची शिवसेना ठाकरेंच्या २ आमदारांना व्हिप देणार नाही, असं शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

गेली दीड वर्षे चाललेला राज्यातील सत्तासंघर्षाचा तिढा आज (ता. १०) सुटणार आहेत. शिवसेना पक्षफुटीनंतर निर्माण झालेल्या ऐतिहासिक राजकीय पेचावर आज (बुधवारी ता. १०) काही वेळात निकाल दिला जाणार आहे. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर आता ‘शिवसेना कोणाची’ आणि ‘ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरणार की शिंदे गटाचे?’ याचा फैसला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सुनावणार आहेत. काही वेळात सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. अशातच शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

शिवसेना (शिंदे गट) ठाकरेंच्या २ आमदारांना व्हिप देणार नाही असं शिरसाट यांनी म्हटलं आहे. निकाल जर शिंदेंच्या बाजूने आला तर ऋतुजा लटके आणि आदित्य ठाकरे यांना व्हीप बजावणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे. आमदार ऋतुजा लटकेंना आम्ही व्हीप देणार नाही, कारण त्यांचा ह्या प्रकरणाशी संबध नाही तर आमदार आदित्य ठाकरे हे ठाकरे कुटुंबातील आहेत, त्यामुळे जाणून बुजून कारवाई केली असं व्हायला नको, म्हणून त्यांना ही व्हीप दिला जाणार नाही असं शिरसाटांनी म्हटलं आहे.

शिवसेना शिंदे गटाचे 16 आमदार

1) एकनाथ शिंदे

2) चिमणराव पाटील

3) अब्दुल सत्तार

4) तानाजी सावंत

5) यामिनी जाधव

5) संदीपान भुमरे

7) भरत गोगावले

8) संजय शिरसाट

9) लता सोनवणे

10) प्रकाश सुर्वे

11) बालाजी किणीकर

12) बालाजी कल्याणकर

13) अनिल बाबर

14) संजय रायमूळकर

15) रमेश बोरनारे

16) महेश शिंदे

(16 MLAs of Shiv Sena Shinde group)

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार

1) अजय चौधरी

2) रवींद्र वायकर

3) राजन साळवी

4) वैभव नाईक

5) नितीन देशमुख

6) सुनिल राऊत

7) सुनिल प्रभू

8) भास्कर जाधव

9) रमेश कोरगावंकर

10) प्रकाश फातर्फेकर

11) कैलास पाटील

12) संजय पोतनीस

13) उदयसिंह राजपूत

14) राहुल पाटील

(Shiv Sena Thackeray group MLA)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात खळबळ ! नामांकित महाविद्यालयाच्या प्राध्यापकाने संपवले जीवन, राहत्या घरी घेतला गळफास; धक्कादायक कारण समोर

'मी त्याला जोरात ढकललं, आणि...' श्रुती मराठेनं सांगितला 'राधा ही बावरी'च्या सेटवरील सौरभसोबत किस्सा, म्हणाली...

All England Open: आता 'लक्ष्य' ऐतिहासिक विजेतेपद! Lakshya Sen ने अंतिम फेरी गाठून घडवलाय इतिहास

8th Pay Commission : आठवा वेतन आयोग लागू होण्याआधी DA बाबत मोठी अपडेट, तुमच्या महागाई भत्त्यात होणार 'इतकी' वाढ

Latest Marathi News Live Update : पुणे विद्यापीठ चौकातील एकात्मिक दुमजली पुलाला अजितदादांचे नाव देण्याचा निर्णय घेऊ- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT