univercity exam esakal
महाराष्ट्र बातम्या

निकालास विलंब झाल्यास ‘त्या’ प्राध्यापकांवर कारवाई? दररोज १०,००० पेपर तपासण्याचे टार्गेट; २० जुलैपर्यंत निकाल लावण्याचे नियोजन

आता पेपर तपासण्याच्या कामात कंटाळा करणारे प्राध्यापक रडावर असणार आहेत. परीक्षेनंतर ३० दिवसात निकाल जाहीर करावा, असा विद्यापीठ अनुदान आयोगाचा नियम आहे. त्या नियमाचा आधार घेऊन कारवाई होऊ शकते.

तात्या लांडगे

सोलापूर : सर्वच अभ्यासक्रमांचे निकाल २० जुलैपर्यंत जाहीर होण्यासाठी सर्व अभ्यासक्रमांचे किमान दहा हजार पेपर तपासून पूर्ण करावेत, असे निर्देश प्रभारी कुलगुरू डॉ. रजनीश कामत यांनी प्राचार्य व सर्व प्राध्यापकांना दिले आहे. निकालाच्या अनुषंगाने दोन दिवसांपूर्वी त्यांनी परीक्षा विभागाशी संबंधित काहींना नोटीस बजावली आहे. आता पेपर तपासण्याच्या कामात कंटाळा करणारे प्राध्यापक रडावर असणार आहेत. परीक्षेनंतर ३० दिवसात निकाल जाहीर करावा, असा विद्यापीठ अनुदान आयोगाचा नियम आहे. त्या नियमाचा आधार घेऊन कारवाई होऊ शकते.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी निकाल वेळेत जाहीर होणे ही प्रमुख बाब आहे. पण, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागासमोरील आव्हाने, अडचणी अजूनही पूर्णतः संपलेल्या नाहीत. नियोजनानुसार उत्तरपत्रिका स्कॅनिंग, तपासणी होत नसल्याने बुधवारी (ता. १२) कुलगुरू डॉ. रजनीश कामत यांनी सर्व प्राचार्यांची बैठक बोलावली होती. ‘बी.कॉम’ची पेपर तपासणी खूपच पिछाडीवर आहे.

दररोज सर्व विषयांचे दहा हजार पेपर तपासून व्हायला हवेत, निकाल २० जुलैपर्यंत लावावाच लागेल, त्याशिवाय पुढील नियोजन व्यवस्थितपणे करता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. वेळप्रसंगी विद्यार्थ्यांसाठी कठोर पावले उचलावी लागतील, असा इशारा त्यांनी या बैठकीत दिल्याचे सूत्रांनी सांगितले. निकालास विलंब कोणामुळे होतोय हे आता नव्याने सुरु केलेल्या ‘डॅशबोर्ड’वरून सर्वांनाच समजणार आहे. त्यामुळे संबंधित प्राध्यापकांना वेळेतच पेपर तपासून द्यावे लागणार आहेत.

प्राध्यापकांनी वेळेत पेपर तपासणी पूर्ण करावी

परीक्षा झाल्यावर ३० दिवसात निकाल जाहीर होणे आवश्यक असतो, जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत नाही. आता बहुतेक प्राध्यापक त्यादृष्टिने पेपर तपासत आहेत. तरीपण, आणखी काही अभ्यासक्रमाचे अपेक्षित पेपर दररोज तपासले जात नाहीत. त्यांनी विद्यार्थी केंद्रबिंदू मानून वेळेत काम पूर्ण करावे, एवढीच अपेक्षा आहे.

- डॉ. रजनीश कामत, प्रभारी कुलगुरू, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

प्रवेशपूर्व चाचणीपूर्वी निकाल आवश्यकच, नाहीतर...

परीक्षापूर्व चाचणी २५ ते २८ जुलै या चार दिवसांत घेण्याचे नियोजन विद्यापीठाने केले आहे. त्याचे वेळापत्रक देखील जाहीर केले आहे. पण, या चाचण्यांपूर्वी सर्वच अभ्यासक्रमांच्या सत्र परीक्षेचे निकाल २० जुलैपर्यंत लागणे आवश्यक आहे. आगामी तीन-चार दिवसात सर्व उत्तरपत्रिका तपासून पूर्ण झाल्यानंतर ते शक्य होणार आहे. नियोजनानुसार पेपर तपासणी पूर्ण न झाल्यास निकालास विलंब होणार आणि परीक्षापूर्वी चाचण्यांचे वेळापत्रक कोलमडणार, अशी स्थिती उद्‌भवू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Accident: भाविकांचे वाहन उलटले, एक ठार, सतरा जखमी; भटाळा येथे गेले होते दर्शनासाठी

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Pune News: रेल्वे चालकाला सात किलोमीटर आधीच दिसणार सिग्नल; प्रवाशांना सुरक्षेचे ‘कवच ४.०’, २५० किमीवर यशस्वी चाचणी!

Rohit Sharma चे खिलाडूवृत्तीचं ज्ञान पाजळणाऱ्या पाकिस्तानला कृतीतून उत्तर! IND vs PAK मॅचआधी वसीम अक्रमशी गळाभेट; Video Viral

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

SCROLL FOR NEXT