HSRP numberplate

 
Sakal
महाराष्ट्र बातम्या

वाहनाला ‘एचएसआरपी’ नंबरप्लेट नसल्यास होणार १००० रुपये दंड! नववर्षापासून अंमलबजावणी; नंबरप्लेट बदलण्यासाठी ३१ डिसेंबर शेवटची मुदत

वाहनांना हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) बसविण्यासाठी शासनाने ३१ डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील साडेसहा लाख वाहनांसह राज्यातील ४० लाखांहून अधिक वाहनधारकांनी ‘एचएसआरपी’ बसविलेली नाही. त्यामुळे आणखी एकदा मुदत द्यावी लागणार आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : वाहनांना हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) बसविण्यासाठी शासनाने ३१ डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील साडेसहा लाख वाहनांसह राज्यातील ४० लाखांहून अधिक वाहनधारकांनी ‘एचएसआरपी’ बसविलेली नाही. त्यामुळे आणखी एकदा मुदत द्यावी लागणार आहे. पण, मुदतवाढीनंतरही हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट न बसविणाऱ्या वाहनास एक हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.

राज्यातील १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या सर्व वाहनांना ‘एचएसआरपी’ नंबरप्लेट बसवावी लागणार आहे. आतापर्यंत परिवहन विभागाने त्यासाठी चारवेळा मुदत दिली आहे. राज्यातील ६८ टक्के वाहनांना हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसविण्यात आले आहेत. पण, अजूनही ३२ टक्के वाहनधारकांनी त्यांच्याकडील वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट बसविलेली नाही.

सोलापूर जिल्ह्यातील नऊ लाख वाहने १ एप्रिल २०१९ पूर्वीची आहेत. त्यापैकी दोन लाख ३५ हजार १७६ वाहनांनी ‘एचएसआरपी’ बसवून घेतली आहे. आता शासनाने दिलेली मुदत संपायला दोन दिवस शिल्लक आहेत, त्यामुळे या मुदतीत सर्व वाहनांना ‘एचएसआरपी’ बसविणे अशक्य आहे. त्यामुळे त्यासाठी आणखी एक महिन्याची मुदतवाढ मिळू शकते, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

...तर होईल प्रत्येकवेळी १००० रुपयांचा दंड

राज्यातील जवळपास एक कोटी वाहनचालकांनी त्यांच्या वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट बसविली आहे. आणखी ३५ टक्के वाहने राहिली आहेत. त्यांच्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. मुदतवाढीनंतरही ‘एचएसआरपी’ न बसविणाऱ्या वाहनांना आगामी काळात १००० रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.

- विवेक भीमनवार, परिवहन आयुक्त

...तर दुसऱ्यावेळी होईल तिप्पट दंड

मूळ नंबरप्लेट बदलून फॅन्सी नंबरप्लेट बसविल्यास पहिल्यांदा त्या वाहनास ५०० रुपयांचा दंड केला जातो. त्यानंतर दुसऱ्यावेळी तिप्पट म्हणजेच १५०० रुपयांचा दंड होतो. दुसरीकडे, नंबरप्लेटमध्ये छेडछाड करून त्याचे रूपांतर नावात केलेल्या वाहनास पहिल्यांदा एक हजार रुपये आणि दुसऱ्यावेळी दोन हजार रुपयांचा दंड केला जातो. वारंवार मुदत देऊनही एचएसआरपी न बसविल्यास आगामी काळात अशा वाहनांना एक हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.

‘एचएसआरपी’ची सोलापूरची स्थिती

  • १ एप्रिल २०१९ पूर्वीची वाहने

  • ९,१३,०००

  • ‘एचएसआरपी’ बसविलेले

  • २,३५,१७६

  • ‘एचएसआरपी’ नसलेली वाहने

  • ६,७७,८२४

  • शासनाने दिलेली मुदत

  • ३१ डिसेंबर २०२५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: नववर्ष स्‍वागताच्या जल्लोषावर पोलिसांची करडी नजर; नियम मोडल्‍यास कारवाई

Latest Marathi News Live Update : नागपुरात वंचितची काँग्रेससोबत आघाडीत -बिघाडी

Indian Post: लिखित परीक्षा नाही! भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये स्टाफ कार ड्रायव्हर भरती; जाणून घ्या अर्ज करण्याची अंतिम मुदत काय?

नागपूर हादरलं! कुऱ्हाडीने वार करून पत्नी, चार वर्षाच्या मुलाची हत्या; जिल्ह्यात उडाली खळबळ, थरारक घटना..

BEST Bus Accident : लोक खरेदी करत होते, तेवढ्यात बस आली अन्...; भांडूप बस अपघाताचा CCTV VIDEO समोर

SCROLL FOR NEXT