HSRP numberplate

 
Sakal
महाराष्ट्र बातम्या

‘HSRP’ नंबरप्लेट नंबर नसल्यास होणार ‘इतका’ दंड! पहिल्यांदा १००० रुपये, त्यानंतर प्रत्येकवेळी १५०० रुपये दंड; सोलापूर जिल्ह्यात ७,२६,९१८ वाहनांना जुनीच नंबरप्लेट

एकूण वाहनांच्या ७५ टक्क्यांच्या आसपासही वाहने अद्याप एचएसआरपी नंबरप्लेटविना फिरत आहेत. मुदतीनंतर त्या वाहनास मोटार वाहन कायद्यातील कलम १७७ नुसार पहिल्यांदा १००० रुपये दंड होणार आहे. त्यानंतर मात्र प्रत्येकवेळी १५०० रुपये दंड होईल, अशी माहिती आरटीओ अधिकाऱ्यांनी दिली.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : आतापर्यंत पाचवेळा मुदतवाढ देऊनही सोलापूर जिल्ह्यातील ९ लाख २६ हजार ८३१ वाहनांपैकी ७ लाख २६ हजार ९१८ वाहने ‘एचएसआरपी’विना (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) धावत आहेत. आता ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. एकूण वाहनांच्या ७५ टक्क्यांच्या आसपासही वाहने अद्याप एचएसआरपी नंबरप्लेटविना फिरत आहेत. मुदतीनंतर त्या वाहनास मोटार वाहन कायद्यातील कलम १७७ नुसार पहिल्यांदा १००० रुपये दंड होणार आहे. त्यानंतर मात्र प्रत्येकवेळी १५०० रुपये दंड होईल, अशी माहिती आरटीओ अधिकाऱ्यांनी दिली.

अपघात किंवा गुन्ह्यातील सहभागी वाहने सहजपणे पकडता यावीत, प्रत्येकाचे वाहन सुरक्षित राहावे म्हणून ‘एचएसआरपी’चे बंधन घालण्यात आले. १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांसाठी ही अट आहे. अनेक गुन्हे व अपघातातील वाहने या नंबरप्लेटमुळे पोलिसांना सहजपणे शोधता आली आहेत. दरम्यान, आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यातील दोन लाख वाहनधारकांनी ती नंबरप्लेट बसवून घेतली आहे. पण, अनेकांनी मुदतवाढ देऊनही त्याकडे पाठ फिरविली आहे. आता राहिलेल्या वाहनधारकांसाठी पुन्हा डिसेंबर २०२५ किंवा जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ द्यावीच लागणार आहे. कारण नंबरप्लेट बसविलेली वाहने एकूण वाहनांच्या २५ टक्के सुद्धा नाहीत.

फॅन्सी नंबर प्लेटसाठी सध्या किती दंड?

अनेक वाहनचालक त्यांच्या वाहनाच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड करतात. नंबरप्लेटवर काहीतरी लिहिणे किंवा एखादा अंक लहान-मोठा करतात. कारवाईत त्या वाहनास पहिल्यावेळी ५०० रुपयांचा दंड होतो. फॅन्सी नंबरप्लेट असल्यास १०० रुपये दंड होतो. काही वाहनचालक तो दंड लगेच भरतात. काहीजण दंड भरतच नाहीत. पण, ज्या ज्यावेळी त्या वाहनावर पुन्हा कारवाई होते, तेव्हा त्यास तिप्पट म्हणजे १५०० रुपयांचा दंड आपोआप ऑनलाइन पडतो. सहा महिन्यांनंतर मग पूर्वीप्रमाणे पहिल्यांदा ५०० रुपये दंड पडतो, अशी दंडाची प्रक्रिया आहे.

सर्वांनी एचएसआरपी क्रमांक बसवून घ्यावा

सध्या नंबरप्लेट संबंधीच्या वाहतूक नियमाखाली वाहनास ५००, १००० व १५०० रुपये असा दंड होतो. ज्या वाहनास एचएसआरपी नंबरप्लेट नाही, त्या वाहनधारकांनी मुदतीत ती बसवून घ्यावी. मुदतीनंतर त्या वाहनांवरही दंडात्मक कारवाई होऊ शकते.

- सुधीर खिरडकर, सहायक पोलिस आयुक्त, सोलापूर शहर

‘एचएसआरपी’ची जिल्ह्यातील स्थिती

  • नंबरप्लेट अपेक्षित असलेली वाहने

  • ९,२६,८३१

  • ‘एचएसआरपी’ बसविलेली वाहने

  • १,९९,९१३

  • नवी नंबरप्लेट न बसविलेली वाहने

  • ७,२६,९१८

  • नंबरप्लेटसाठी अपेक्षित खर्च

  • ४५० ते २००० रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmer Agitation : शेतकरी आंदोलनाचे केंद्र ठरला राष्ट्रीय महामार्ग; शेतकऱ्यांच्या ‘महाएल्गार’मुळे ३० तास बंद

Numerology News : मूलांकाप्रमाणे 'या' तारखेला जन्मलेले लोक असतात 'महास्वार्थी'! पण प्रेमात निघतात सगळ्यात लकी..हे तुम्ही तर नाही ना?

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 1 नोव्हेंबर 2025

‘टीईटी’च्या निर्णयाविरुद्ध राज्य सरकार गप्पच! राज्यातील ३५ शिक्षक संघटनांनी उपसले आंदोलनाचे हत्यार, ९ नोव्हेंबरला राज्यभर मूक मोर्चाचे नियोजन

आजचे राशिभविष्य - 1 नोव्हेंबर 2025

SCROLL FOR NEXT