if you get a chance definitely go to bigg boss says gulabrao patil  esakal
महाराष्ट्र बातम्या

Gulabrao Patil बिग बॉसमध्ये जाणार; 'त्या' विधानामुळे चर्चेला उधाण

सकाळ डिजिटल टीम

शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील बिग बॉसमध्ये जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विशेष म्हणजे त्यांनी स्वतःहून यासंदर्भात वक्तव्य केलं आहे. (if you get a chance definitely go to bigg boss says gulabrao patil )

जळगाव येथे एका कार्यक्रमात गुलाबराव पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी बिग बॉसमध्ये बोलावलं तर नक्की जाऊ. बिग बॉसमध्ये जाण ही माझ्यासाठी सोन्यासारखी संधी असेल, असे गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.

नेमकं काय म्हणाले गुलाबराव पाटील?

गुलाबराव पाटलाला बिग बॉसमध्ये जर कोणी बोलवत असेल आणि अशी संधी मिळत असेल तर मला माझ्या मागच्या जीवनाची आठवण होतेय, असे सांगत लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला.

बिग बॉसमध्ये बोलावले तर ही सोन्यासारखी संधी आहे, मिळाली तर निश्चितपणाने जाऊ, असेही मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

बिग बॉस हा भारतीय टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय वादग्रस्त रिअॅलिटी शो आहे. कलाकार किंवा विविध क्षेत्रातील प्रसिद्ध किंवा वादग्रस्त व्यक्तिमत्त्व हे बिग बॉस या शोमधील स्पर्धक असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सीजेपीच्या 'तिरंगा मार्च'ला आडकाठी! दिल्लीतील सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा निर्णय; अभिजित दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, '100 ठिकाणी...'

Drunk and Driver : कोथरूडमध्ये ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’चा थरार; तीन ते चार जण किरकोळ जखमी, २४ वर्षीय कारचालक विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

Mangalwedha News : मंगळवेढा तालुक्यात 4777 कुटुंबाचे धान्य ऐन दुष्काळात बंद

Manchar Water Issue : आंबेगाव तालुक्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईवर तातडीने नियोजन करा; प्रांताधिकारी अर्चना तांबे यांचे अधिकाऱ्यांना आदेश

PM नरेंद्र मोदींना भेटले Asiad पदकविजेते भारतीय खेळाडू, वैभव सूर्यवंशीच्या रिअॅक्शनचा Video होतोय Viral

SCROLL FOR NEXT