If you want to rent a house here are some things to keep in mind  
महाराष्ट्र बातम्या

भाड्याने घर घेताय! घर घेतल्यानंतर मालकासोबत काहीच वाद होऊ नये यासाठी जाणून घ्या 'या' गोष्टी

सुस्मिता वडतिले

पुणे : नोकरी, शिक्षण किंवा इतर कारणांमुळे अनेकदा लोकांना नव्या ठिकाणी घरापासून दूर रहावं लागतं. अशावेळी आपल्याला सोयीचं ठरेल अशा ठिकाणी राहण्यासाठी घर, रूम शोधणं हे थोडं आव्हानात्मकच असतं. बऱ्याचदा सहजपणे घर मिळतंही पण ते भाड्याने घेत असताना आपल्याला इतर काही गोष्टी पाहणं महत्त्वाचं असतं. नव्या ठिकाणी गेल्यानंतर ऑफिस, महाविद्यालय आहे त्याच्या आसपास भाड्याने घर शोधणे सुरु होते. परंतु घर भाड्याने घ्यायचे म्हणजे सुरवातीला थोडं टेन्शन येतं.

नवीन परिसर, नवे घर, आजूबाजूची नवी माणसे आणि घर मालक हे सारे व्यवस्थित मिळेल की नाही याची चिंता असते. यावेळी भाडेकरूला अशा अनेक बऱ्याच गोष्टींची काळजी घ्यावी लागते. याकडे लक्ष दिलं नाही तर भाडेकरू आणि घर मालक अशा दोघांनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पुढे काही अडचणी येऊ नयेत यासाठी विशेष लक्ष देणे गरजेचे असते. 

तुम्हाला जेव्हा भाड्याने घर घ्यायचे असते तेव्हा घराची अवस्था कशी आहे इथंपासून ते भाड्याची रक्कम, अॅग्रीमेंट इत्यादी अनेक गोष्ट नीट चर्चा कराव्या लागतात. अ‍ॅग्रीमेंटमध्ये डिपॉझिटच्या पैशांबाबत दिलेली माहिती कधीही घर किंवा अपार्टमेंट भाड्याने घेण्यापूर्वी भाडेकरुंनी जाणून घेतली पाहिजे. त्यात कायदेशीर करार असला पाहिजे. तसेच संपूर्ण डिपॉझिटच्या आणि महिन्याच्या पैशांबाबत स्पष्ट माहिती दिलेली असावी. भाड्याच्या रकमेशिवाय इतर काही खर्च करारामध्ये आहेत का? असल्यास कोणते हेसुद्धा तपासून पहावे. 

महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला लागणाऱ्या मूलभूत गरजांची पूर्तता होऊ शकते का हे पाहणं. पाणी आणि वीज याची व्यवस्था कशी आहे. दोन्हींच्या वापरासाठी तुम्हाला भाड्याव्यतिरिक्त पैसे द्यावे लागतात का? याची चौकशी करा. तसंच तुम्ही ज्या घरात राहणार आहात तिथं फर्निचर किंवा इतर काही वस्तू असतील तर त्या वापरताना त्यासाठी काय नियम आहेत याचीही माहिती घ्या. जर तुमच्याकडून फर्निचर किंवा घरातील इतर वस्तूंचे नुकसान झाले तर त्यासाठी पैसे द्यावे लागतील. त्याचा उल्लेख करारामध्ये करण्यात आलाय का हे जाणून घ्या.

घर घेताना वार्षिक आणि मासिक देखभाल खर्चाबाबत असलेल्या अटी समजून घेतल्या पाहिजे. कारण तीच एक मोठी समस्या असते. अशावेळी भाडेकरुला या गोष्टींची आधीपासून माहिती असणे गरजेचे असते. त्यामुळे घरभाड्याचा करार करण्याआधीच भाडेकरुने घरमालकाशी व्यवस्थित चर्चा करुन घेतली पाहिजे. घर भाड्याने घेताना खूप महत्वाचे आहे जे रेंटल अ‍ॅग्रीमेंटमध्ये ही घरातून शिफ्ट होण्यापूर्वी भाडेकरुला काय इन्वेन्टरीज मिळणार आहे. त्यात इलेक्ट्रिक गीझर, पंखा, लाइट्स आणि किचन एक्सेसरीज यांचा समावेश असतो. यासोबतच पुढील घरभाडेवाढ या साऱ्या गोष्टीबद्दल अधिक माहिती तुम्हाला असणे खूप महत्त्वाची आहे.

एजंट धनंजय कानगुडे म्हणाले, काहीजण पहिल्यांदा भाड्याचे घर घेत असतील तर या काही गोष्टी विचारायला विसरून जातात.  तसंच घरमालक ही अनेकदा सांगायला विसरतात. आजही देशामध्ये काही भागात घर भाड्याने घेण्याआधी काही रक्कम डिपॉझिट म्हणून देणे आवश्यक असते. सुरवातीला घरमालक एका महिन्याच्या घर भाड्याची वसुली करुन घेतो, जेणेकरुन पेंटिंग आणि दुरुस्तीचा खर्च निघून जाईल. भाड्याच्या घरात राहिल्यानंतर त्या घरातील स्थिती पहिल्यासारखी राहत नाही. त्या घरात बरेच दिवस राहिल्यानंतर घरामधील भिंतीचे रंग उडणे आणि काही नुकसान होणे हे स्वाभाविक आहे. त्याची दुरुस्ती, रंगरंगोटी कधी करण्यात येईल. इतर सुविधा वेळच्या वेळी कशा मिळतील हे सांगायला हवं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EV कडे वाढता कल, पण सुरक्षिततेचा मोठा प्रश्न! दुर्घटनेनंतर मंत्र्यांचा इशारा; चार्जिंगला लावून झोपलेल्या कुटुंबातील 8 जण जिवंत जळाले

Latest Marathi News Live Update : लाकडाच्या मागणीत 50 टक्के वाढ

Tiger Hunting Video : मृत्यू समोर असताना मोर उडून गेला, पण वाघाच्या तावडीत 'त्या' हरणाच्या पिल्लाचा दुर्दैवी अंत झाला; जबड्यात धरलेली मान पाहून मन हेलावून जाईल!

Gold Rate Today: सोनं आणखी स्वस्त! आठवड्यात 6 हजारांची घसरण; आजचा 1 तोळ्याचा भाव किती?

Hockey World Cup चे बिगूल वाजले! भारत-पाकिस्तान संघात पुन्हा आमने-सामने; १६ संघांचे ग्रुप्स जाहीर

SCROLL FOR NEXT