महाराष्ट्र बातम्या

अवैध उपसा दंडाची आकारणी होणार कमी

सिद्धेश्‍वर डुकरे

मुंबई : अवैध मार्गाने वाळू तस्करी करणारी वाहने, वाळू उपशासाठी वापरली जाणारी यंत्रसामग्री जप्त केल्यावर महसूल प्रशासनाकडून त्यावर दंडापोटी रक्‍कम वसूल केली जाते. ही दंडाची रक्‍कम कमी करण्याचा सरकारचा विचार असून, पुढील काही दिवसांत याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत येणार असल्याचे सूत्रांकडून समजते. 

राज्यात लिलाव काढून नदीघाट, वाळूचे पट्टे उपशासाठी दिले जातात. तरीही अवैध, चोरट्या मार्गाने वाळूउपसा केला जातो. अशा वाळूमाफियांना जरब बसावी म्हणून सरकारने जबर दंड आकारणी लागू केली आहे. त्यामुळे चोरट्या वाळूला आळा बसावा. नद्यांची बेसुमार लूट होऊ नये. पर्यावरणाची हानी होऊ नये, हा यामागील विचार आहे. मात्र, अलीकडे राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्णयाने वाळूउपशावर अनेक मर्यादा आल्या आहेत. यामुळे अनेक ठिकाणच्या लिलावाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही.

त्याचबरोबर औरंगाबाद येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठात जवळपास 90 याचिका, त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालयात सुमारे 20 याचिका, अशा प्रकारे अवाच्या सवा दंड आकारला जात आहे, तो कमी करावा, या संदर्भात दाखल झाल्या आहेत. या सर्व बाबीचा विचार करून महसूल विभागाने जप्त केलेली वाहने, साधन सामग्री आदींवरील दंडाची रक्‍कम कमी करण्याचे जवळपास निश्‍चित केले आहे. राज्यात शहरी लोकसंख्येचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे घरांची मागणी वाढत आहे.

पंतप्रधान आवास योजना, परवडणारी घरे आदी योजनांचे प्रकल्प सुरू आहेत. तर, ग्रामीण भागात घरकूल योजना, खासगी घर बांधणी यासाठीदेखील वाळूची मोठ्या प्रमाणात गरज निर्माण झाली आहे. 

सध्याची दंड आकारणी 

-ड्रील मशिन- 25 हजार, ट्रॅक्‍टर, ट्रॅक्‍टर ट्रॉली, हाफ बॉडी ट्रक, सक्‍शन पंप- 1 लाख रुपये, फुल बॉडी ट्रक, डंपर, ट्रॉलर, कंप्रेसर- 2 लाख रुपये, ट्रॉलर, बार्ज, मोटोराईज्ड बोट- 5 लाख रुपये , एक्‍सकॅवेटर, कॅकेनाईज्ड लोडर- साडेसात लाख रुपये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराणी ताराराणी जैन समुदायाच्या, जैन मुनी नयन पद्मसागर यांचं विधान

Baglan Crop Damage: बागलाणमध्ये १४ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान; पंचनामे व सरसकट नुकसान भरपाईची मागणी करत दीपिका चव्हाण आक्रमक

"विशालने आता हद्द पार केली" राकेशचं कुटूंब बिग बॉसमधील भांडणावरून संतापले; अन्याय म्हणत केली कारवाईची मागणी

Dubai Gold Import: दुबईतून सोन्याची आयात वाढणार! स्वस्त सोनं आणण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय

Narayangaon Rain : गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान; तातडीने पंचनामा करण्याची शेतकऱ्यांची मागणी

SCROLL FOR NEXT