dr. goutam kambale sakal solapur
महाराष्ट्र बातम्या

निरक्षर आई-वडिल करायचे मोलमजुरी, गुरूंची मदत, भावाची साथ मिळाली अन्‌ प्रा. गौतम बनले विद्यापीठाचे प्र-कुलगुरू

जिल्हा परिषद शाळेतून प्राथमिक तर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेतून बारावीपर्यंत शिक्षण घेतलेला गौतम पुढे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा प्र-कुलगुरू बनला. अचूक टप्प्यांवर गुरूंची साथ व मार्गदर्शनामुळे त्यांना हे शक्य झाले.

तात्या लांडगे

सोलापूर : जिल्हा परिषद शाळेतून प्राथमिक तर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेतून बारावीपर्यंत शिक्षण घेतलेला गौतम पुढे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा प्र-कुलगुरू बनला. अचूक टप्प्यांवर गुरूंची साथ व मार्गदर्शनामुळे त्यांना हे शक्य झाले आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. कांबळे यांचे प्राथमिक शिक्षण (सातवीपर्यंत) संगदरी (ता. दक्षिण सोलापूर) येथील जिल्हा परिषद शाळेतून झाले. त्यानंतर त्यांनी सम्राट चौकातील रयत शिक्षण संस्थेच्या रावजी सखाराम हायस्कूलमधून दहावीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर अकरावी ते पदवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी दयानंद महाविद्यालयातून पूर्ण केले.

त्यावेळी त्यांना आयुष्याला अचूक वळण देणारा गुरू प्रा. बी. एच. दामजी यांच्या रूपाने लाभला. त्यांनी अर्थशास्त्राचा अवघड विषय अतिशय सोप्या भाषेत शिकवला आणि त्यात डॉ. कांबळे यांना गोडी निर्माण झाली. पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर डॉ. कांबळे यांनी पुढे एम.ए, एम.फील, पीएच.डी. चे शिक्षण शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथून पूर्ण केले. त्याठिकाणी त्यांना प्रा. जे. एफ. पाटील व डॉ. रमेश दांडगे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. डॉ. दांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गौतम कांबळे यांनी पीएच.डी. पूर्ण केली. पुढे त्यांच्यासाठी जॉबच्या अनेक संधी निर्माण झाल्या.

डॉ. गौतम कांबळे यांचा जीवन प्रवास

संशोधन कसे करायचे, यावर अचूक मार्गदर्शन विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी केले. त्यातूनच १९९९ मध्ये कोल्हापूर येथील न्यू कॉलेज येथे सहायक प्राध्यापक म्हणून नोकरीला लागले. २०१० मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सेालापूर विद्यापीठात सहयोगी प्राध्यापक झाले.

२०१३ मध्ये प्राध्यापकपदी त्यांची नेमणूक झाली. २०१८ पासून त्यांच्याकडे सामाजिक शास्त्र संकुलाच्या संचालकाची जबाबदारी होती. तत्पूर्वी, त्यांनी सिनेट, विद्या परिषद, परीक्षा व मूल्यमापन मंडळ आणि व्यवस्थापन परिषदेचे सदस्य म्हणूनही काम पाहिले होते. त्यांचा अनुभव व कामाची पावती म्हणून २४ मे २०२३ रोजी त्यांची नेमणूक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या प्र-कुलगुरुपदी झाली. आता ते व्यवस्थित काम पाहत आहेत.

आई-वडिलांचे संस्कार अन्‌ गुरुंच्या मार्गदर्शनातून घडलो

कुटुंबाला कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमीवर नव्हती. आई-वडील अशिक्षित होते, ते मोलमजुरी करायचे. आई नेहमी सांगायची गरिबांसाठी काम कर. मोठा भाऊ दुर्योधन कांबळे याने शिक्षणासाठी मोठी मदत केली. आई-वडिलांचे संस्कार व भावाच्या कष्टामुळे मला शिक्षणाची प्रेरणा मिळाली. घरातील कोणीच शिक्षित नसल्याने मला उच्च शिक्षणावेळी गुरूंनी मार्गदर्शन केले. त्यामुळेच मी या पदापर्यंत पोचू शकलो.

- डॉ. गौतम कांबळे, प्र-कुलगुरू, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT