rain update Maharashtra Rain Update esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Weather forecast| राज्यात पुन्हा पाऊस बरसणार,थर्टिफर्स्टआधी मुसळधार!

ओमकार वाबळे

राज्यात पुन्हा एकदा पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यावर्षी उन्हाळा, आणि हिवाळ्यातही पाऊस बरसला आहे. त्याशिवाय वर्षभरात जवळपास दर महिन्याआड पाऊस पडलाय. त्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. (Rainfall in Maharashtra)

डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाही राज्यात पावसाच्या सरी बरसल्या होत्या. नुकतीच थंडी सुरू झाल्याने सर्वत्र तापमान खालावलं आहे. मात्र पावसामुळे काही काळासाठी थंडी कमी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने (IMD) वर्तवला आहे. याआधी अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यासाठी भरपाई देण्याची मागणी विरोधीपक्षांनी केली आहे. सध्या काही ठिकाणी पंचनामे सुरू आहेत. (Maharashtra Weather forecast) ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट पैसे जमा होणार असल्याची माहिती सरकारच्या वतीने देण्यात आली. (Maharashtra Rain Update)

कुठे आणि किती पाऊस होणार?

राज्यात 28 डिसेंबरला औरंगाबाद, जालना आणि मराठवाड्याच्या काही भागात पाऊस बरसणार आहे. याशिवाय राज्यातील उत्तर भागातही पाऊस होणार आहे. जळगाव, धुळे या भागात काही ठिकाणी हवामान ढगाळ राहिल. तर गोंदिया, भंडारा, वर्धा, नागपूर, अमरावती,अकोला जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस अपेक्षित आहे.

पश्चिम महाराष्ट्रत तुरळक पाऊस होईल, असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. वारा (30-40 किमी ताशी) वेगाने पुढे सरकेल. तर 27 डिसेंबरला विर्दभात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: विराट कोहलीचे प्लेइंग इलेव्हनमध्ये नाव नाही, आजच्या सामन्याला मुकला? रजत पाटीदारचा महत्त्वाचा निर्णय

इतिहास जिवंत! गावकऱ्यांनी पुन्हा जगला शिवराय व महाराणी गुणवंताबाईंचा विवाह सोहळा, ३७० वर्षांपूर्वीचा 'तो' दिवस डोळ्यासमोर उभा!

MS Dhoni Fitness: महेंद्रसिंग धोनीचं ठरलं! IPL 2026 चा पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार; पण CSK संघात कोणाची जागा घेणार?

CBSE Class 10 Result: सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर; यंदा ९३.७० टक्के उत्तीर्ण, मुली पुन्हा आघाडीवर

Akola Summer Heatwave : अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? पारा पोहोचला ४४.२ अंशांवर; सकाळी १० नंतरच रस्ते ओस

SCROLL FOR NEXT