Weather Update Esakal
महाराष्ट्र बातम्या

Weather Update: वेळेपूर्वीच केरळमध्ये धडकणार मान्सून; मुंबईत कधी कोसळणार पाऊस? जाणून घ्या सविस्तर

Weather Update: राज्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली आहे तर काही भागात अद्याप उन्हाचा पारा जाणवत आहे. अशातच अएक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. राज्याच्या पुढील काही तासांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली आहे तर काही भागात अद्याप उन्हाचा पारा जाणवत आहे. अशातच एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. राज्याच्या पुढील काही तासांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतील हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्याच येत्या 48 तासांत जोरदार पावसाची शक्यता आहे.

आज मुंबई, ठाणेसह कोकणात दिवसभर उषेणतेची लाट जाणवत आहे, तरी पुढील काही तासात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची तुरळक स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 28 आणि 29 मे रोजी तुरळक ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मोसमी वारे अरबी समुद्र आणि मालदीवपर्यंत पोहोचले असून अरबी समुद्र आणि हिंदी महासागरात मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. यानुसार मान्सून केरळमध्ये वेळेपूर्वी पोहोचणे अपेक्षित आहे. मान्सून दक्षिण अरबी समुद्र आणि मालदीवमार्गे लक्षद्वीपमार्गे केरळमध्ये धडकणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

मुंबईत मान्सून कधी येणार?

इंडियन एक्स्प्रेसने आयएमडी अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईमध्ये १० जूनपासून मान्सूनची शक्यता आहे. मान्सून अंदमानमध्ये दाखल झाला असून तो १० ते ११ जून दरम्यान मुंबईत पोहोचेल, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. साधारणपणे, मान्सून साधारणपणे ११ जून रोजी मुंबईत दाखल होतो, गेल्या वर्षी, चक्रीवादळ बिपरजॉयमुळे दोन आठवडे उशीर झाला होता.

मान्सून सक्रीय होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रासाठी ही आनंदाची बातमी आहे. समुद्राच्या लाटांमधून किनारपट्टीवर मातीच्या रंगाची फेणी येण्यास सुरुवात झाली आहे. मान्सून कधी येणार यांचे मच्छिमार ठोकताळे बांधत असतात. मान्सून सक्रिय होण्याच्या काही दिवस समुद्र किनारी फेणीचे पाणी दिसते. त्यानुसार आता समुद्राच्या लाटांमधून किनारपट्टीवर फेणी दिसू लागलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : "नाशिकला संधी दिली आता मुंबईत संधी द्या" - अमित ठाकरे

Education Department : शिक्षक पुरस्काराबाबत उदासीनता; १० तालुक्यांतून केवळ दोन-दोनच प्रस्ताव

Crime News : ‘मुलबाळ होत नाही’ म्हणून विवाहितेचा छळ; धारदार हत्याराने वार करून जीवे ठार मारल्याचा आरोप

'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’च्या शूटिंगला सुरुवात ! आदिती तटकरे यांच्या हस्ते मुहूर्त सोहळा संपन्न

SCROLL FOR NEXT