Maharashtra Rain Alert  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Rain Alert : राज्यासाठी पुढील २४ तास महत्वाचे; 'या' भागात बरसणार मुसळधार, पुण्यासह या भागाला ऑरेंज अलर्ट

Maharashtra Rain Alert : कोकणासह मध्य महाराष्ट्रामध्ये मान्सूनचं आगमन झाल्यामुळे मुसळधार पाऊस सुरू आहे. तर येत्या २४ तासांमध्ये मान्सून मुंबईमध्ये दाखल होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्याच्या अनेक भागामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पुणे, सोलापुरसह अनेक जिल्ह्यांमध्ये काल मुसळधार पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. कोकणासह मध्य महाराष्ट्रामध्ये मान्सूनचं आगमन झाल्यामुळे मुसळधार पाऊस सुरू आहे. तर येत्या २४ तासांमध्ये मान्सून मुंबईमध्ये दाखल होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे आजपासून पुढील ४ दिवस राज्यातील इतर भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

हवामान विभागाकडून आजपासून पुढील 3 दिवस ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. या दिवसात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. पुढील 24 तासांसाठी राज्यातील सर्वच जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज मध्य महाराष्ट्र कोकण आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर दुसरीकडे उत्तर कोकण आणि मुंबईत देखील मान्सून पूर्व पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आजपासून (९ जून) मान्सूनचा प्रवास झपाट्याने होणार आहे. त्यामुळे राज्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. रविवारी दक्षिण कोकण, उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पुढील काही तासांमध्ये मुंबईसह उपनगर, पालघर, अहमदनगर, नाशिक, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांनाही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, वाशिम जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT