imd rain update no alert issue to any district monsoon weather forecast sakal
महाराष्ट्र बातम्या

Weather Update : राज्यात पावसाचा जोर ओसरला; कोणत्याही जिल्ह्यात तूर्त अलर्ट नाही

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ६५ मिमीपर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला असून, त्या ठिकाणी ग्रीन अलर्ट देण्यात आला

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार, राज्यात पावसाचा जोर ओसरला असून पुढील २४ तासांकरिता राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला रेड, ऑरेंज किंवा यलो अलर्ट देण्यात आलेला नाही, अशी माहिती मंत्रालयातील नियंत्रण कक्षाकडून प्रसिद्धीस देण्यात आली आहे.

तसेच, राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ६५ मिमीपर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला असून, त्या ठिकाणी ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे. पुढील २४ तासांकरिता किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांसाठी दुपारी ३:१५ वाजता भरतीची वेळ देण्यात आली असून, साधारण ४.५ मीटरपर्यंत समुद्राच्या लाटा येण्याचा अंदाज आहे.

दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याचेही सांगण्यात आले. वीज कोसळण्याची शक्यता असणाऱ्या जिल्ह्यांतील नागरिकांनी आपली माहिती अद्ययावत ठेवण्यासाठी आपल्या मोबईलमध्ये दामिनी हे ॲप डाऊनलोड करावे. हे ॲप वापरणाऱ्यांना २० ते ४० किलोमीटर जीपीएस नोटिफिकेशनद्वारे सावध करते.

महत्त्वाच्या धरणांतील पाणीसाठा व विसर्ग

धरण - जिल्हा -एकूण क्षमता (दलघमी) -आतापर्यंतचा विसर्ग (क्युसेकमध्ये)

हतनूर -जळगाव -२५५- ४७६

गोसेखुर्द- भंडारा -७४०.१७ -५१०.०२

भंडारदरा -अहमदनगर- ३०४.१० -५४.०८

दारणा -नाशिक- २०२.४४- ३५.४०

धोम-बलकवडी- सातारा- ११२.१४- २४

राधानगरी- कोल्हापूर -२१९.९७ -१२१

ऊर्ध्व वर्धा- अमरावती- ५६४.०५- १४१

बेंबळा -यवतमाळ -१८३.९४- ४०

निम्न वर्धा -वर्धा -२१६.८७ -१७.४३

वारणा- सांगली- ७७९.३४ -२४३

चासकमान -पुणे -२१४.५०- ४७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्येष्ठ नागरिक आक्रमक! 'डीजेमुक्त सोलापूरसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा'; डीजेग्रस्तांचा आवाज जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्तांच्या कानावर

Vice President Election 2025 : बहुमत नाही म्हणून एनडीएची विरोधी पक्षांना मतदानाची विनंती; उद्धव ठाकरेंच्या खासदाराचा दावा

Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मिरची होती का? जेवणात काय झणझणीत वापरत होते?

Bail Pola Festival 2025: आज आवतण घ्या, उद्या जेवायला या; खांदेमळणीने सुरू होणार कृषी संस्कृतीचा उत्सव बैलपोळा

Panchganga River : पंचगंगा नदी धोका पातळीपासून ३ इंच दूर; बावडा-शिये मार्ग बंद, नदीकाठी सतर्कतेचा इशारा, 'या' मार्गांवर वाहतूक बंद

SCROLL FOR NEXT