Weather Update Esakal
महाराष्ट्र बातम्या

Weather Update : येत्या ४८ तासांत मुसळधार पावसाची शक्यता, काही ठिकाणी गारपीट; शेतकऱ्यांची चिंता वाढली

रोहित कणसे

सध्या राज्यात तसेच उत्तर भारतातील दिल्ली, उत्तर प्रेदश आणि इतर राज्यात देखील थंडीचा जोर वाढला आहे. यादरम्यान भारतीय हवामान खात्याने अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रात देखील काही जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

हवामान विभागाने जारी केलेल्या अंदाजानुसार तामिळनाडूमध्ये १५ ते १७ डिसेंबर, केरळ आणि माहेमध्ये १६ ते १८ डिसेंबर, तर लक्षद्वीपमध्ये १७ आणि १८ डिसेंबरदरम्यान हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीटीचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.

केरळमध्ये येत्या ४८ तासांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला असून जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबादमध्ये हलका पाऊस आणि हिमवर्षाव होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पूर्व आसाम, अरुणाचल प्रदेश, लक्षद्वीप आणि दक्षिण केरळमध्ये हलका पाऊस होण्याची शक्यता असून दिल्लीत तापमानाचा पारा घसरल्याने पंजाब आणि हरियाणामध्ये दाट धुके पडण्याचा अंदाज आहे.

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील ४८ तासांत महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. उर्वरित भागात ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी थंडी वाढण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT