Cyber ​​police watch on social media Action for spreading offensive posts rumours esakal
महाराष्ट्र बातम्या

सायबर पोलिसांकडून महत्त्वपूर्ण माहिती! बनावट फेसबूक, इन्स्टाग्राम अकाउंट करता येते तत्काळ बंद; तुमचे कोणी बनावट खाते उघडले आहे का? असे पहा, वाचा...

सध्या प्रत्येकाकडे ॲन्ड्राईड मोबाईल आहे आणि त्यांचे सोशल मीडियावर अकाउंट आहेच. त्यातील अनेकांच्या अकाउंटचे सेटिंग ‘पब्लिक’ आहे, म्हणजेच त्या वापरकर्त्यांचे मित्र, फोटो सर्वांनाच सहजपणे पाहता येतात. अशा अकाउंटवर सायबर गुन्हेगारांचे विशेष लक्ष असते. त्या व्यक्तीच्या अकाउंटवरून एक-दोन फोटो घेऊन सायबर गुन्हेगार स्वत:च बनावट अकाउंट तयार करतात.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : सायबर गुन्हेगारांनी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपअधीक्षक संकेत देवळेकर, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांच्या नावे बनावट फेसबुक अकाउंट काढले. त्यावरून कोणाची फसवणूक झाली नाही, कारण या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ रिपोर्ट करून खोटे अकाउंट बंद केले. इतरांना देखील त्यांच्या नावे सोशल मीडियावर कोणी बनावट अकाउंट उघडले असल्यास त्यांना एका संकेतस्थळावरून तक्रार नोंदवून ते बंद करता येईल, अशी माहिती सोलापूर शहर सायबर पोलिसांनी दिली.

सध्या प्रत्येकाकडे ॲन्ड्राईड मोबाईल आहे आणि त्यांचे सोशल मीडियावर (फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स) अकाउंट आहेच. त्यातील अनेकांच्या अकाउंटचे सेटिंग ‘पब्लिक’ आहे, म्हणजेच त्या वापरकर्त्यांचे मित्र, फोटो सर्वांनाच सहजपणे पाहता येतात. अशा अकाउंटवर सायबर गुन्हेगारांचे विशेष लक्ष असते. त्या व्यक्तीच्या अकाउंटवरून एक-दोन फोटो घेऊन सायबर गुन्हेगार स्वत:च बनावट अकाउंट तयार करतात. त्यातून संबंधित व्यक्तीच्या ओळखीच्यांना मेसेज करून पैसे मागतात. काहीवेळा त्यांच्या अकाउंटवरील वैयक्तिक फोटोंचा गैरवापर देखील होऊ शकतो.

त्यामुळे प्रत्येकाने त्यांच्या अकाउंटचे सेटिंग एकतर ‘ओन्ली मी’ किंवा फक्त मित्रांनाच दिसेल, असे निवडावे असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे. जेणेकरून, अनोळखी सायबर गुन्हेगारांना तुमच्या अकाउंटमधील फोटो घेऊन बनावट खाते तयार करता येणार नाही. दुसरीकडे नागरिकांनी देखील कोणता मित्र फेसबूक, इन्स्टाग्रामवरून पैसे मागत असेल तर त्याला फोन करून खात्री करा, मेसेज आला म्हणून पैसे पाठवू नका किंवा त्याने विचारलेली माहिती देऊ नका, असेही सायबर पोलिसांनी सांगितले आहे.

वापरकर्त्यांनी ‘हे’ लक्षात ठेवावे...

  • फेसबूक असो की इन्स्टाग्राम खात्याचे सेटिंग पब्लिक ठेवू नये, त्यांच्या मित्रांनाच किंवा स्वत:लाच दिसेल असे सेटिंग ठेवावे.

  • सोशल मिडियावर आपले नाव टाकून प्रत्येकजण आपल्या नावे कोणी बनावट खाते तयार केले आहे का, याची खात्री करू शकतो.

  • ज्या वापरकर्त्याचे बनावट फेसबुक, इन्स्टाग्राम अकाउंट सायबर गुन्हेगारांनी बनविले, त्यांनी सायबर पोलिसांशी तत्काळ संपर्क साधावा.

  • https://help.meta.com/requests/1371776380779082 या संकेतस्थळावर वापरकर्ता रिपोर्ट करू शकतो.

नागरिकांनी घ्यावी खबरदारी

सायबर गुन्हेगार शासकीय अधिकारी, राजकीय व्यक्तींच्या नावे बनावट फेसबूक, इन्स्टाग्रामचे अकाउंट तयार करतात. त्यावरून त्यांच्या ओळखीच्या व्यक्तींना मेसेज पाठवून पैसे मागितले जातात. अशावेळी त्यांनी तात्काळ सायबर पोलिस किंवा जवळच्या पोलिस ठाण्यात रिपोर्ट करावा. त्या व्यक्तीला देखील त्यांच्या मोबाईलवरून रिपोर्ट करता येतो. तसेच कोणी सोशल मिडियावर मेसेज पाठवून पैसे मागत असेल तर नागरिकांनी त्याची खात्री करावी, अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते.

- श्रीशैल गजा, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सोलापूर शहर (सायबर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Police Recruitment : पोलिस भरतीत ‘शॉर्टकट’चा स्फोट! शक्तीवर्धक पेय घेताच उमेदवाराचा मैदानावर धिंगाणा, थरारक क्षणांनी सर्वच शॉक

IPL 2026: ऋतुराज गायकवाडला संजू सॅमसनमुळे CSK संघात जाणवतोय धोका? माजी कर्णधाराचा खळबजनक दावा

Gemma 4 : इंटरनेटची गरज संपली! गुगलने लॉन्च केले Gemma 4; आता डेटा संपला तरी मोबाईल चालेल सुपरफास्ट, कसं वापरायचं पाहा

Gold Rate: सोनं 30 हजारांनी स्वस्त! चांदीही 1.6 लाखांनी घसरली; आता भाव वाढणार की अजून पडणार?

Parbhani News: ही तर दिवसाढवळ्या परभणीकरांची लूटच!; टॅंकर माफियांकडून नागरिक वेठीस; हजार लिटरसाठी घेताहेत ५०० रुपये

SCROLL FOR NEXT