महाराष्ट्र

"घराच्या छतावर येऊन उभं राहा", महाडच्या लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवा

दीनानाथ परब

महाड: सध्या कोकणात पावसाने (kokan rain) थैमान घातले आहे. त्यामुळे कोकणातील नद्या दुथडी भरुन वाहत (river over flowing) असून पूरस्थिती (flood siutation) निर्माण झालीय. महाडमध्ये तर सावित्री नदीने रौद्ररुप धारण केले आहे. महाडमध्ये भीषण पूरस्थिती आहे. दरम्यान आता नौदल, NDRF ची पथक मदतीसाठी महाडमध्ये दाखल झाली आहेत. या दरम्यान रायगडच्या जिल्हा माहिती केंद्राकडून महत्त्वपूर्ण टि्वट करण्यात आलं आहे. (Important message for people of mahad rescue operation started dmp82)

महाड मधील पूरग्रस्तांच्या बचावकार्याला रेस्क्यू टीम आणि हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुरुवात झालेली आहे. महाडमधील लोकांना घरच्या छतावर येऊन उभं रहाण्याचं आवाहन करण्यात येत आहे. जेणेकरून हेलिकॉप्टर मधील रेस्क्यू टीमला ते दिसतील.

महाडमधल्या स्थितीबाबत प्रवीण दरेकरांनी दिली ही माहिती

"महाडला जाण्याचा आमचा प्रयत्न सुरु आहे. पाणी असल्यामुळे टोळ फाट्यावर थांबलो आहोत. एनडीआरएफचा बोटीने पुढे जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. महाड शहर पाण्याखाली आहे. लोक इमारतींच्या गच्चीवर, एसटीच्या टपावर बसले आहेत. खारवली, माटवण, राजावाडी सगळी गावं पुराने वेढली आहेत" अशी माहिती दरेकर यांनी दिली.

"हेलिकॉप्टर येत असल्यामुळे आशा निर्माण झाली आहे. लोकांपर्यंत मदत पोहोचवणे, त्यांना सुरक्षित स्थळी आता नेता येईल. आम्ही मुंबईशी संपर्कात आहोत. साहित्य आणलं, तरी तिथपर्यत पोहोचू शकत नाही. समन्वयाच्या अडचणी आहेत. मदत कशी पोहोचणार हा चिंतेचा विषय आहे. हेलिकॉप्टर आल्यामुळे आता यंत्रणा थोडी हलताना दिसत आहे" असे दरेकर म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT