government scheme sakal
महाराष्ट्र बातम्या

सरकारी योजनेच्या लाभार्थींसाठी महत्त्वाची बातमी! आता लाभाचे पैसे ३ महिने बॅंकेत पडून राहिल्यास ती रक्कम शासनजमा होणार..

शासनाच्या वतीने सध्या महसूल सप्ताह राबविला जात असून त्याअंतर्गत संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेतील नव्या लाभार्थींच्या घरी जाऊन त्यांना मंजुरीचे प्रमाणपत्र दिले जात आहे. यावेळी त्यांना तलाठ्यांमार्फत शासनाच्या योजनांची माहिती देखील दिली जात आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : शासनाच्या वतीने सध्या महसूल सप्ताह राबविला जात असून त्याअंतर्गत संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेतील नव्या लाभार्थींच्या घरी जाऊन त्यांना मंजुरीचे प्रमाणपत्र दिले जात आहे. यावेळी त्यांना तलाठ्यांमार्फत शासनाच्या योजनांची माहिती देखील दिली जात आहे.

सोलापूर जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेचे एक लाख ५७ हजार लाभार्थी आहेत. याशिवाय दरमहा सुमारे ५०० लाभार्थी वाढत आहेत. डिसेंबर २०२४ पासून प्रत्येक लाभार्थींना योजनेचा लाभ ‘डीबीटी’द्वारे थेट दिला जात आहे. पण, त्यासाठी सर्व लाभार्थींना त्यांची कागदपत्रे सोलापूर शहरातील संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयाकडे जमा करावी लागणार आहेत. सात महिन्यांत जिल्ह्यातील एक लाख ४२ हजार लाभार्थींनी कागदपत्रे सादर केली, पण आणखी १५ हजार लाभार्थी पुढे आलेले नाहीत. ते लाभार्थी जोपर्यंत आधार प्रमाणीकरण करून त्यांची वैयक्तिक कागदपत्रे डीबीटी पोर्टलवर अपलोड करीत नाहीत, तोपर्यंत त्यांना योजनेचा लाभ मिळणारच नाही. यासंदर्भात देखील महसूल सप्ताहाच्या निमित्ताने जनजागृती केली जात आहे.

पात्र लाभार्थींना निराधार योजनेचा मिळतो लाभ

सोलापूर जिल्ह्यात संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेतील १५ हजार लाभार्थींनी अद्याप त्यांची कागदपत्रे सादर केलेली नाहीत. त्यांची कागदपत्रे ‘डीबीटी’ पोर्टलवर अपलोड न झाल्यास त्यांना लाभाची रक्कम मिळणार नाही. महसूल सप्ताहानिमित्त जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आता नव्याने मंजूर झालेल्या लाभार्थींना तलाठ्यांमार्फत घरोघरी मंजुरी पत्र दिले जात आहे.

- शिल्पा पाटील, तहसीलदार, संजय गांधी निराधार योजना, सोलापूर

...तर बॅंकेतील रक्कम शासनजमा होणार

शासनाच्या वैयक्तिक योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थींसाठी दरमहा अनुदान दिले जाते. त्यांना अडचणी येऊ नयेत हा त्यामागील हेतू आहे. तरीपण, तीनपेक्षा जास्त महिने होऊनही एखादा लाभार्थी योजनेचे बॅंक खात्यातील रक्कम घेऊन गेलेला नसल्यास त्यांची रक्कम बॅंकांमार्फत पुन्हा शासनजमा केली जात आहे. शासनाचे तसे आदेश आहेत. त्यानुसार संजय गांधी निराधार योजनेसह अन्य योजनांच्या अधिकाऱ्यांनी बॅंकांना पत्रव्यवहार केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loan Waiver Alert: कर्जमाफी की सिबिलवर डाग? ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ योजनेतील OTS नोंदीमुळे ५६ लाख शेतकऱ्यांच्या पतक्षमतेवर संकट

Neeraj Chopra CWG26: नीरज चोप्राने पाकिस्तानी अर्शद नदीमवर कुरघोडी केली, पण ८४ मीटरचे पात्रता अंतर गाठण्यात अपयशी; फायनलमध्ये पोहोचला की नाही?

सलमान खानने विकला कोट्यवधींचा फ्लॅट; तरीही हातात पडला फक्त 'एवढाच' नफा!

Latest Marathi News Live Update : नागपूरमध्ये आज पुन्हा पावसाला सुरुवात

Mumbai News: आरामदायी गाड्यांवर महापालिकेची उधळपट्टी! पदाधिकाऱ्यांवरील २ कोटी १६ लाखांचा खर्च वाया, नव्या गाड्या सहा महिन्यांत आवडेनाशा

SCROLL FOR NEXT