solapur city

 

sakal

महाराष्ट्र बातम्या

वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी! मंगळवेढ्याकडून येणारी वाहने ५४ मीटर रस्त्यावरुन येणार सोलापुरात; शेटेनगर रोडवरील वाहतूक कोंडी कमी होणार, सविस्तर वाचा...

मंगळेवढा रोडवरील देगावजवळील सीएनएस हॉस्पिटलजवळून शहरात येणारा ५४ मीटर रस्ता आजपासून वाहतुकीसाठी खुला होणार आहे. तो रस्ता जुना पूना नाका येथील धर्मवीर संभाजी महाराज चौकात येतो. मंगळवेढा रोडवरून शहरात येणारी वाहने व दमाणी नगरातून शेटेनगर रेल्वे बोगद्याकडे जाणारी चारचाकी वाहने, रिक्षा देखील ५४ मीटर रस्त्यावरुन वळविली जाणार आहेत.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : मंगळेवढा रोडवरील देगावजवळील सीएनएस हॉस्पिटलजवळून शहरात येणारा ५४ मीटर रस्ता आजपासून वाहतुकीसाठी खुला होणार आहे. तो रस्ता जुना पूना नाका येथील धर्मवीर संभाजी महाराज चौकात येतो. मंगळवेढा रोडवरून शहरात येणारी वाहने व दमाणी नगरातून शेटेनगर रेल्वे बोगद्याकडे जाणारी चारचाकी वाहने, रिक्षा देखील ५४ मीटर रस्त्यावरुन वळविली जाणार आहेत. जेणेकरुन वाहतूक कोंडी होणार नाही, असे नियोजन शहर वाहतूक पोलिसांचे आहे.

सध्या मंगळवेढ्याकडून सोलापूरला येणाऱ्या वाहनांसाठी हत्तूर-केगाव बायपास हा पर्यायी रस्ता आहे. तरीपण दररोज साधारण ३ हजार चारचाकी, दुचाकीस्वार शहराच्या दिशेने येतात. ही वाहने आता सीएनएस हॉस्पिटलजवळून ५४ मीटर रस्त्याने वळविली जाणार आहेत. त्यासाठी तेथे दोन वाहतूक अंमलदार नेमले जाणार आहेत.

याशिवाय दमाणी नगर, देगाव परिसरातून शहरात येणाऱ्या शालेय विद्यार्थी वाहतूक करणारी वाहने, अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता त्या परिसरातील अन्य वाहने देखील ५४ मीटर रस्त्यानेच जातील, असे नियोजन केले आहे. उद्यापासून (शुक्रवारी) ५४ मीटर रस्ता वाहतुकीसाठी खुला होणार असल्याने सध्याच्या पर्यायी रस्त्यावरील वाहतूक कोंडी निश्चितपणे टळेल, असा विश्वास वाहतूक पोलिसांनी व्यक्त केला आहे. वाहतूक नियमनासाठी १५ पोलिस अंमलदार या रोडवर नेमले जाणार आहेत. तर मरिआई चौक, दमाणीनगर, शेटे नगर, मोदी बोगदा या पर्यायी रोडवर देखील २० वाहतूक अंमलदार नेमले आहेत.

सकाळ-सायंकाळी होते वाहतूक कोंडी

दमाणीनगर परिसरातील रेल्वे पूल पाडकामामुळे या रोडवरील वाहतूक मरिआई चौक, नागोबा मंदिर, शेटेनगर मोदी बोगदा या रोडवरून वळविण्यात आली आहे. प्रत्येक तासाला अंदाजे १२०० वाहने या पर्यायी रोडवरून ये-जा करतात. त्यात दुचाकी, रिक्षांचे प्रमाण अधिक आहे. २४ तास या रस्त्यावरुन वाहतूक सुरुच असते. पण, सकाळी ७.१५ ते १०.३० आणि सायंकाळी ५ ते ८.३० या वेळेत या पर्यायी रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे.

रस्त्यावर लावले दिवे

५४ मीटर रोडवर ज्या ज्या ठिकाणी अंधार होता, त्याठिकाणी पथदिवे लावले आहेत. बोगद्यातही दिवे लावण्यात आले आहेत. सोलापूरकरांसाठी हा नवा रस्ता आता कायमस्वरूपी वाहतुकीसाठी वापरता येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी दिली. तो रस्ता शुक्रवारी (ता. १२) सकाळी सहापासून वाहतुकीसाठी खुला होईल.

५४ मीटर रस्त्यामुळे कमी होईल वाहतूक कोंडी

दमाणीनगर येथील रेल्वे पूल रविवारी (ता. १४) पाडून तेथे नवा पूल उभारला जाणार आहे. त्यामुळे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौक ते मरिआई चौक (देगाव रोड) वाहतुकीसाठी वर्षभर बंद राहणार आहे. त्या रोडवरील वाहतूक पर्यायी रस्त्याने वळविण्यात आली आहेत. पण, वाहनधारकांनी वाहतूक शिस्त पाळली तर कोठेही वाहतूक कोंडी होणार नाही. रस्ता अरुंद असताना देखील वाहनचालक घाई करतात, त्यामुळे वाहतूक कोंडी होते.

- सुधीर खिरडकर, सहायक पोलिस आयुक्त, सोलापूर शहर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: अजिंक्य रहाणेच्या KKR संघाला पुन्हा मोठा धक्का! गंभीरचा लाडका पठ्ठ्या संपूर्ण हंगामातूनच झाला बाहेर

Why Leopard Enters Villages : काळजाचा ठोकाच चुकला! अंगणात भांडी घासताना पुढ्यातच उभा राहिला बिबट्या; त्याला बघून युवती पडली बेशुद्ध, साताऱ्यातील थरारक घटना

Latest Marathi News Live Update : ग्रामीण भागातही गॅससाठी रांगा, मोवाड-नरखेडमध्ये नागरिकांची सकाळपासून गर्दी

Shivaji University : विद्यापीठ कॅम्पसमधील ‘भूजल’ धोक्यात; सांडपाणी जमिनीत मुरविणे घातक, अधिसभा सदस्यांची प्रशासनाविरोधात नाराजी

Pune Bengaluru Highway Accident : कापड दुकानात करत होता काम, घरी पत्नी होती गर्भवती..; नियतीनं म्हाकवेच्या सौरभला कसं हिरावून नेलं? पुणे-बंगळूर महामार्गावर काय घडलं?

SCROLL FOR NEXT