Electric Shock sakal
महाराष्ट्र बातम्या

वीजग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! ‘हे’ उपकरण घरात बसवा, शॉक लागूनही होणार नाही कोणाचा मृत्यू; सोलापूर जिल्ह्यात ८ दिवसांत ६ जणांचा करंट लागून गेला जीव

विजेची गळती होत असल्यास वीजपुरवठा खंडित करून शॉक बसलेल्यास वाचविण्यासाठी ‘महावितरण’ने अवशिष्ट करंट सर्किट ब्रेकर (आरसीसीबी) हे विद्युत सुरक्षा उपकरण तयार केले आहे. मात्र, अनेकांना दुर्घटना होईपर्यंत त्याचे महत्त्व समजत नाही. सोलापूर शहर-जिल्ह्यात आठ दिवसांत झालेल्या तीन दुर्घटनांमध्ये सहा जणांना जीव गमवावा लागला आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : विजेची गळती होत असल्यास वीजपुरवठा खंडित करून शॉक बसलेल्यास वाचविण्यासाठी ‘महावितरण’ने अवशिष्ट करंट सर्किट ब्रेकर (आरसीसीबी) हे विद्युत सुरक्षा उपकरण तयार केले आहे. मात्र, अनेकांना दुर्घटना होईपर्यंत त्याचे महत्त्व समजत नाही. सोलापूर शहर-जिल्ह्यात आठ दिवसांत झालेल्या तीन दुर्घटनांमध्ये सहा जणांना जीव गमवावा लागला आहे. कदाचित, दुर्घटना घडलेल्या ठिकाणी ‘आरसीसीबी’ उपक्रम असते तर या दुर्घटना घडल्याच नसत्या, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘आरसीसीबी’ उपकरण असे आहे, जे विद्युत शॉक आणि विद्युतप्रवाहामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी मदत करते. हे उपकरण सर्किटमधील गळतीचा प्रवाह शोधून काढते आणि जर हा प्रवाह निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त झाला, तर ते सर्किटमधील वीजपुरवठा त्वरित खंडित करते. ज्यामुळे जीवितहानी किंवा उपकरणांचे नुकसान होत नाही. हे उपकरण विद्युत शॉक लागण्यापासून संरक्षण करते. जेव्हा एखादी व्यक्ती किंवा प्राणी विद्युतवाहक तारेला चुकून स्पर्श करते, तेव्हा सर्किटमध्ये गळतीचा प्रवाह तयार होतो. पण, माळशिरसमधील महाळुंग, दक्षिण सोलापुरातील हत्तुर आणि सोलापूर शहर, अशा तीन घटनांमध्ये प्रत्येकी दोघांचा शॉक लागून जागेवरच मृत्यू झाल्याच्या दुर्घटना घडल्या आहेत.

‘आरसीसीबी’ उपकरण नेमके काय आहे?

सामान्य ऑपरेटिंग परिस्थितीत, ‘आरसीसीबी’ हे सर्किटमधून वाहणाऱ्या विद्युत प्रवाहाचे निरीक्षण करते. येणारा विद्युत प्रवाह (लाइव्ह वायर) परत येणाऱ्या प्रवाहाशी (न्यूट्रल वायर) जुळतो का ते तपासते. तरीपण, चुकून जिवंत वायरला किंवा खराब झालेल्या वायरला स्पर्श केला, तर काही विद्युतप्रवाह तटस्थ वायरमधून परत येण्याऐवजी जमिनीवर गळू शकतो. यामुळे विद्युतप्रवाह असंतुलित होतो. पण, जेव्हा ‘आरसीसीबी’ला विद्युत प्रवाह असंतुलित जाणवतो तेव्हा ते आपोआप सर्किटची वीज बंद करते. ही क्रिया एका सेकंदाच्या काही अंशात घडते. प्रवाह खंडित झाल्याने विजेचा धक्का रोखला जातो. त्यामुळे ते उपकरण जिवंत वस्तूला स्पर्श केल्यावर होणाऱ्या विजेच्या झटक्यांपासून बचाव करते, ज्यामुळे दुखापत किंवा धोका कमी होतो.

दुर्घटना टाळण्यासाठी ग्राहकांनी उपकरण वापरावे

महावितरणच्या सर्व ग्राहकांनी विजेचा शॉक लागून मृत्यू किंवा गंभीर जखमी होण्याच्या दुर्घटना टाळण्यासाठी ईलसीबी किंवा आरसीसीबी यापैकी कोणतेही एक उपकरण बसवावे.

- सुनील माने, अधीक्षक अभियंता, महावितरण, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICICI Bank: बँकेची मोठी घोषणा... आता खात्यात 10,000 रुपयां ऐवजी किमान 50,000 रुपये ठेवावे लागतील

Mohammed Siraj: सिराज माझ्यावर प्रचंड रागावला होता...! अजिंक्य रहाणेकडून मोठी कबुली; नेमकं काय झालेलं?

सेटवर सगळ्यांसोबत कशी वागते तेजश्री प्रधान? मालिकेतील भावाने सांगितला अनुभव; म्हणाला- अशी गोड दिसते पण ती खूप...

Ladki Bahin Yojana : पुरुष 'लाडकी बहीण' कसे बनले? २६ लाख अपात्र असलेल्यांचे अर्ज मंजूर कसे झाले? वाचा नेमका कुठं घोळ झाला

Pension Dispute Assault : पेन्शनचे पैसे न दिल्याने पोरानं काठीने आईला केली मारहाण, पत्नी आडवण्यास गेली अन्

SCROLL FOR NEXT