करिअर Sakal
महाराष्ट्र बातम्या

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ‘या’ अभ्यासक्रमातून शिक्षण पूर्ण केल्यावर करिअरची मोठी संधी; प्रवेशाची पात्रता अन्‌ प्रवेश प्रक्रिया, जाणून घ्या...

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आता विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या विषयातून शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर, मेकॅनिकल व आर्टिफिशियल इंटेलिजन्स या अभ्यासक्रमांमधून विद्यार्थ्यांना आता करिअरच्या मोठ्या संधी मिळणार आहेत.

तात्या लांडगे

सोलापूर : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (एनईपी) आता विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या विषयातून शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर, मेकॅनिकल व आर्टिफिशियल इंटेलिजन्स या अभ्यासक्रमांमधून विद्यार्थ्यांना आता करिअरच्या मोठ्या संधी मिळणार आहेत. मूळ अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यावर विद्यार्थ्यांना नवीन धोरणानुसार त्यांचे आवडीचे विषय घेऊनही शिकता येत असल्याने त्यांना आता एकापेक्षा जास्त क्षेत्रात जॉब किंवा करिअर करता येणार आहे.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना मेजर व मायनर असे विषय घेता येतात. प्रमुख विषयांसोबत विद्यार्थ्यांना दुसऱ्या अभ्यासक्रमातील आवडीचे विषय देखील घेता येतात. दरम्यान, इलेक्ट्रिकल व्हेईकल, रोबोटिक, इंडस्ट्रियल ऑटोमेशन, ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रॉनिक्स, थ्रिडी-प्रिंटिंग, एम्बेडेड सिस्टम, अशा प्रमुख विषयातून अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण होताच करिअरच्या मोठ्या संधी मिळणार आहेत. इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर, मेकॅनिकल व आर्टिफिशियल इंटेलिजन्स या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक धोरणानुसार त्यांच्या आवडीनुसार वरील विषय निवडता येणार आहेत.

पात्रता अन्‌ प्रवेश प्रक्रिया कशी...

  • अभियांत्रिकीला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याने इयत्ता बारावीत भौतिकशास्त्र, गणित हे दोन विषय आणि रसायनशास्त्र (केमिस्ट्री) किंवा जीवशास्त्र (बायोलॉजी) यापैकी एक विषय घेतलेला असावा.

  • इयत्ता बारावीतील त्या तीन विषयात खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यास किमान ४५ टक्के तर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यास ४० टक्के गुण आवश्यक.

  • जेईई व सीईटी या दोन्ही परीक्षा अभियांत्रिकी प्रवेशासाठी आहेत. अभियांत्रिकीस प्रवेश घेणाऱ्याने ‘सीईटी’ दिलेली असावी. ‘सीईटी’ला कमी गुण पडले तरी व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश मिळतो, पण ही परीक्षा देण्याचे बंधन आहे

बेरोजगारी कमी होण्यास मोठी मदत होईल

आर्टिफिशियल इंटेलिजन्सशिवाय इतरही विषयातून किंवा अभ्यासक्रमातून अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील. इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर, मेकॅनिकल व आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक धोरणानुसार मायनर (ऑप्शनल) विषय घेऊन त्याचेही ज्ञान घेता येईल. त्यातून आगामी काळात बेरोजगारी कमी होण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास वाटतो.

- डॉ. शंकर नवले, प्राचार्य, सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, केगाव

दोन्ही क्षेत्रात विद्यार्थ्यांना करिअरची संधी मिळणार

कॉम्प्युटर शाखेला प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांचा दुसरा पर्याय आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) हा आहे. काळाची गरज ओळखून आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स ॲण्ड डेटा सायन्स हा कोर्स विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करुन दिला आहे. डेटा सायन्स व आर्टिफिशियल इंटेलिजन्स या दोन्ही क्षेत्रात विद्यार्थ्यांना करिअरची संधी मिळणार आहे.

- डॉ. बी. के. सोनजे, ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

IND vs PAK सामन्यानंतर वातावरण तापलं; सूर्या अन् हार्दिक कुलदीप यादववर भडकले, नेमकं काय घडले; पाहा Viral Video

5G च्या नावाखाली तुमची फसवणूक तर होत नाहीये ना? घरबसल्या 'इथून' चेक करा तुमच्या एरियातलं नेटवर्क

Latest Marathi News Update : नाशिकच्या दरी मातोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

Central Railway: शिमग्याला गावी जाणाऱ्यांसाठी आनंदवार्ता! विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ, आरक्षण सुरू; पाहा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT