Land acquisition esakal
महाराष्ट्र बातम्या

सोलापूरकरांसाठी महत्त्वाची बातमी! 5 वर्षांपासून रखडलेला गुंठेवारी प्लॉटधारकांना जागेवर मिळणार मोजणी नकाशा; आजपासून ‘या’ 5 भागात शिबिरे़; सोबत न्यावीत ‘ही’ कागदपत्रे

पाच वर्षांपासून रखडलेल्या गुंठेवारी मोजणीचा विषय अखेर मार्गी लागणार आहे. महापालिका नगररचना आणि भूमिअभिलेख विभाग कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आजपासून ते ५ जून या कालावधीत शेळगी, दहिटणे, बाळे, कसबे सोलापूर आणि केगाव येथे शिबिरे आयोजित केली आहेत. या शिबिरांमध्ये जागेवर मोजणी नकाशा नागरिकांना उपलब्ध होणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

सोलापूर : पाच वर्षांपासून रखडलेल्या गुंठेवारी मोजणीचा विषय अखेर मार्गी लागणार आहे. महापालिका नगररचना आणि भूमिअभिलेख विभाग कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आजपासून ते ५ जून या कालावधीत शेळगी, दहिटणे, बाळे, कसबे सोलापूर आणि केगाव येथे शिबिरे आयोजित केली आहेत. या शिबिरांमध्ये जागेवर मोजणी नकाशा नागरिकांना उपलब्ध होणार आहे.

महापालिका प्रशासनाकडून २००१ च्या पुराव्यावर २०१९ पर्यंत गुंठेवारी बांधकामास परवानगी देण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यानंतर गुंठेवारी बांधकाम परवान्याला मोजणीची अट घालण्यात आली. त्यामुळे महापालिकेतील कायम व मानधनावर काम करणाऱ्या अभियंत्यांकडे प्रस्तावित साधारण तीन हजार प्रकरणे महापालिकेकडे पाच वर्षे धूळखात पडून आहेत. गुंठेवारीतील जागेचे मोजणी पत्रक मिळविण्याची प्रक्रिया अत्यंत किचकट व खर्चिक असल्याने ते सर्वसामान्यांना न परवडणारे होते. मोजणी पत्रक मिळत नसल्याच्या अनेकांच्या तक्रारी होत्या, काहींनी अधिकाऱ्यांना चिरीमिरी देऊन काम साधत मोजणी पत्रक सादर केले. बांधकाम विभागाकडून वर्षाला हजारोंच्या संख्येत गुंठेवारी परवानगी दिली जात होती. परंतु २०१९ नंतर मोजणी पत्रकाच्या अटींमुळे पाच वर्षांत केवळ १०० ते १५० गुंठेवारी प्रकरणांना परवागनी दिली गेली आहे. त्यामुळे महापालिकेच्या बांधकाम विभागाचे उत्पन्न २० कोटींनी घटले होते. मागील पाच वर्षांत साधारण १०० कोटी रुपयांनी उत्पन्न घटले.

सर्वसामान्यांची अडचण दूर करण्यासाठी आमदार विजयकुमार देशमुख यांनी याबाबत शासनदरबारी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे पाठपुरावा करून हा विषय मार्गी लावला. प्रशासकीय स्तरावर याबाबत आता शिबिरे घेण्याचे नियोजन केले आहे. आजपासून या शिबिराला सुरुवात होत आहे. शेळगी, दहिटणे, बाळे, कसबे सोलापूर, केगावमध्ये या भागातील नागरिकांसाठी आजपासून शिबिर आयोजित करण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आली.

मोजणीसाठीची पूर्वीची प्रक्रिया

  • महापालिकेच्या बांधकाम विभागात प्रस्ताव सादर करणे

  • अधिकाऱ्यांकडून प्रस्तावाची छाननी

  • प्रस्तावावर मोजणी पत्रक नसल्याचा शेरा मारून मोजणीसाठी पत्र देणार

  • संबंधित मिळकतदार भूमीअभिलेख विभागाकडून पैसे भरून मोजणी पत्रक आणून सादर करणार

‘ही’ कागदपत्रे सोबत न्या...

शिबिराला जाताना संबंधित प्लॉटचे खरेदी खत (सत्यप्रत), जागेचा चालू ७/१२ उतारा, कर पावती, प्राथमिक जागा आराखडा (प्राथमिक ले-आउट), जागेचा कच्चा नकाशा (चतु:सीमा), आधारकार्ड ही कागदपत्रे आवश्यक आहेत. कागदपत्र सादर केल्यानंतर संबंधित प्लॉटधारकाला महापालिकेकडून नाहरकत (एनओसी) दिले जाईल. ती एनओसी भूमी व मालमत्ता विभागाकडून ऑनलाईन फिडिंग करून त्यानुसार नाममात्र फी आकारणी करून मोजणी शिबिरातच नकाशा देण्यात येईल.

शुल्क किती, शिबिरात कळविले जाईल

ज्या मिळकतदारांना गुंठेवारी जागेच्या बांधकाम परवान्यासाठी मोजणी नकाशा हवा आहे. त्या मिळकतदारांनी कागदपत्रांसहित शिबिरात प्रस्ताव द्यावा. त्या मिळकतदारांना एनओसी दिली जाईल. एनओसीवरून शिबिरात मोजणी नकाशे उपलब्ध करून दिले जातील. त्यासाठी भूमी अभिलेख विभागाकडून आकारली जाणारी फी बाबतची शिबिरात कळविण्यात येईल.

- आनंद जोशी, अभियंता, नगररचना

‘या’ ठिकाणी आज शिबिरे

आज मंगळवारी (ता. ३) शेळगी येथील लोकमंगल मल्टिस्टेटच्या बाजूच्या मातोश्री मंगल कार्यालयामध्ये सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत शिबिर होणार आहे. तरी नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Protest : नेपाळमध्ये आंदोलनाचा भडका! पंतप्रधान ओलींचा राजीनामा; तरुणाांनी अर्थमंत्र्यांना पळवून पळवून मारलं...

Islampur Crime: 'बेकायदेशीर जमाव जमवून इस्लामपुरात दोन गटांत हाणामारी'; पूर्वी झालेल्या वादाच कारण, पाेलिस ठाण्यात गुन्हे दाखल

Latest Marathi News Updates: आंदोलकांनी संसद पेटवली, पंतप्रधान ओलींनी देश सोडला

Ayush Komkar News: नातवाची हत्या, आजोबासह मावशी आणि भावंडं अटकेत | Vanraj Andekar | Bandu Andekar | Sakal News

Sangli Crime: 'शेगावमध्ये घरफोडीत ४ लाखांचे सोने पळविले'; जत पोलिसांत गुन्हा, शोधासाठी पथक रवाना

SCROLL FOR NEXT