sakal solapur
तात्या लांडगे
सोलापूर : भारत निवडणूक आयोगाच्या वतीने सध्या मतदार याद्यांचे शुद्धीकरण सुरू आहे. त्यासाठी २००२ रोजी अस्तित्वात असलेल्या मतदार यादीला आताच्या मतदार यादीसोबत जुळविले जात आहे. येत्या काळात नव्याने मतदार नोंदणी करण्यासाठी मतदारांना २००२ च्या मतदार यादीतील नावासोबत त्यांची वंशावळ जुळविणे बंधनकारक असणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी लक्ष्मण कसेकर यांनी दिली.
महाराष्ट्रात सध्या एसआयआरचे कामकाज अंतिम टप्प्यात आले आहे. सोमवारपर्यंत (ता. १७) बीएलओ मतदारांच्या घरोघरी जाऊन मतदारांना गणना पत्रक देत आहेत, त्यांच्याकडून भरून घेतलेले गणनापत्रक ऑनलाइन पद्धतीने सबमिट केले जात आहे. सध्या मतदार यादीत असलेल्या मतदाराची वंशावळ २००२ रोजी अस्तित्वात असलेल्या मतदार यादीतील नावांशी जुळविली जात आहे. ज्यांची नावे जुळली जात नाहीत, त्यांना प्रशासनाच्या वतीने येत्या काळात कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे.
सोलापूर जिल्ह्यात असलेल्या ३९ लाख ४१ हजार ९५ मतदारांना गणनापत्रक वाटप करण्यात आले आहे. गणना पत्रक वाटप केलेल्या मतदारांपैकी ६ लाख ९ हजार ६१७ मतदारांकडून अद्याप गणनापत्रक प्राप्त झालेले नाही. गणनापत्रक न मिळालेल्या मतदारांमध्ये करमाळ्यातील ४७ हजार ६६०, माढ्यातील ३७ हजार ५६, बार्शीतील ४९ हजार ३७६, मोहोळमधील ६५ हजार ८५५, सोलापू्र शहर मध्य मधील १ लाख १७ हजार ९३२, अक्कलकोटमधील ६५ हजार ७८१, सोलापूर दक्षिणमधील ५५ हजार १४६, पंढरपुरातील ६१ हजार ७९१, सांगोल्यातील ३४ हजार १६८, माळशिरसमधील ३७ हजार ६०९ मतदारांचा समावेश आहे. या मतदारांचा शोध बीएलओ व प्रशासनाच्या वतीने घेतला जात आहे.
गणनापत्रक न देणारे मतदार संकेतस्थळावर
जिल्हाधिकारी कार्यालयाची वेबसाईट solapur.gov.in यावर गणना पत्रक भरून न देणाऱ्या मतदारांची नावे आज प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्ह्यातील मतदारांनी ही यादी तपासून आपले नाव या यादीमध्ये समाविष्ट असल्यास तत्काळ बीएलओ यांच्यासोबत संपर्क साधावा. गणनापत्रक भरून द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. गणनापत्रक भरून न देणाऱ्या उमेदवारांची नावे मतदार यादीतून वगळण्याची प्रक्रिया येत्या काळात केली जाणार आहे.
असे आहे वेळापत्रक
बीएलओ घरोघरी येणार : १७ ऑगस्टपर्यंत
मतदान केंद्राची पुनर्रचना : १७ ऑगस्ट
एसआयआरनंतर प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी : २४ ऑगस्ट
प्रारूप मतदार यादीवर सूचना व हरकतींसाठी मुदत : २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर
दावे, हरकतींचा निपटारा : २४ ऑगस्ट ते २२ ऑक्टोबर
अंतिम मतदार यादी प्रसिध्दी : २७ ऑक्टोबर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.