Imtiaz Jaleel and Eknath Shinde  
महाराष्ट्र बातम्या

Imtiaz Jaleel: छत्रपती संभाजीनगरच्या नामांतरावर जलील संतप्त; म्हणाले, सरकार लोकांना वेड्यात काढण्यासाठी...

रवींद्र देशमुख

छत्रपती संभाजीनगर - काही दिवसांपूर्वीच औरंगाबाद शहराच्या नामांतराची घोषणा केली होती. मात्र हा मुद्दा कायद्याच्या कचाट्यात अडकला होता. शिवाय ग्रामीणला छत्रपती संभाजीनगर हे नाव देण्यात आलं नव्हतं. आज याबाबत घोषणा करण्यात आली. आज पुन्हा एकदा नामांतरासंदर्भात नोटीफिकेशन काढण्यात आलं. यावरून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

मराठवाड्याच्या पॅकेजसंदर्भात जलील म्हणाले की, आम्हाला काहीही अपेक्षा नाही. केवळ निवडणुकासमोर ठेवून गाजर दाखवण्याचं काम सुरू आहे. २०१६ मध्ये घोषणा केल्या होत्या. हेच लोक तेव्हा सत्तेत होते. त्यावेळी घोषणा केलेले कामं अजुनही सुरू झाली नाही. त्यांचा एकच उद्देश आहे की, शहरामध्ये निवडणुकीला कसा फायदा होईल, असा आरोपही जलील यांनी केला.

नामांतरावर जलील म्हणाले की, सरकार निवडणूक पुढं ठेवून काम करत आहेत. मराठवाड्यात आल्यावर त्यांनी शेतकऱ्यांसाठी घोषणा करणं अपेक्षीत होतं. नामांतराचा मुद्दा कोर्टात आहे. मग घोषणा कशी केली असा सवाल जलील यांनी केला. तसेच तुमचा उद्देश काय आहे, इथं येण्याचा ते सांगा. तुम्ही नाव बदललं, तर मग आश्वासन द्या की, एकही शेतकऱ्याची आत्महत्या होऊ देणार नाही, युवकांना रोजगार देऊ. केवळ लोकांना वेड्यात काढण्यासाठी हे आले आहेत, असंही जलील यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT