Imtiaz Jaleel esakal
महाराष्ट्र बातम्या

...तर जालन्यातूनच निवडणूक लढवू, इम्तियाज जलील यांनी दिले संकेत

औरंगाबादतून निवडून आल्यावर आता औरंगाबादचे खरे नाही, अशी भीती लोकांमध्ये पसरवण्यात आली होती.

सकाळ डिजिटल टीम

जालना : औरंगाबादतून निवडून आल्यावर आता औरंगाबादचे खरे नाही, अशी भीती लोकांमध्ये पसरवण्यात आली होती. पण कामातून आम्ही औरंगाबादमधील सर्व जातीधर्माच्या लोकांची मने जिंकण्यात यशस्वी झालो, असे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) म्हणाले. जालना (Jalna) येथील ईद स्नेहमिलन आणि सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे जलील म्हणाले, गेल्या निवडणुकीत पाच हजार मतांनी विजयी झालो. (Imtiaz Jaleel Says, If Party President Allowed, I Will Contest Lok Sabha Election From Jalna)

येत्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ५० हजार मतांची आघाडी घेऊन निवडून येऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोणासाठी दंगल फायद्याची नाही. औरंगाबादमध्ये (Aurangabad) २०१७ मध्ये दंगल झाली. त्यात अनेकांची दुकाने जाळण्यात आली. ती विविध जातीधर्माच्या लोकांची होती. एमआयएमने सर्व दुकाने उभी करण्यास मदत केली.

जालन्यातील सत्कार आणि एमआयएमला मिळत असलेल्या प्रतिसादाने भारावून गेलो असून पक्षाच्या अध्यक्षांनी आदेश दिला तर जालन्यातूनच निवडणूक लढवू, अशी इच्छा जलील यांनी याप्रसंगी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Katraj Accident : कात्रज-कोंढवा रस्त्यावर भीषण अपघात; विद्यार्थिनीचा मृत्यू

गणेशोत्सवात चाकरमान्यांचा कोकणचा प्रवास सुकर! सीएसएमटी-सावंतवाडी रेल्वे सुरु, 'अशी' करा सीट बुक

Strawberry Cultivation : आंबेगाव, खेड, जुन्नर व मावळ तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी लागवडीसाठी ४.९६ कोटी रुपये निधी मंजूर; विधानसभा माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील

Marathi News Live Updates : मिरवणूक बंदीकडे चाललेली पावले थांबली नाहीत तर भविष्यात उत्सवच बंद होतील - साऊंड असोसिएशन

Maratha Reservation: जरांगेंचं उपोषण सुरु असताना नाशिकमध्ये मराठा समन्वयकांची पत्रकार परिषद; SEBC आरक्षणावर ठाम!

SCROLL FOR NEXT