Vidhan sabha  sakal
महाराष्ट्र बातम्या

Vidhan sabha : काँग्रेस पक्ष मुंबईत फोडणार प्रचाराचा नारळ ; प्रभारी चेन्निथला यांची माहिती,राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम

पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त (२० ऑगस्ट) मुंबईत काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त (२० ऑगस्ट) मुंबईत काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात येणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह देशभरातील पक्षाचे वरिष्ठ नेते या कार्यक्रमात सहभागी होणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार)अध्यक्ष शरद पवार व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेही यावेळी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती काँग्रेसचे राज्याचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी दिली आहे.

पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडल्यानंतर रमेश चेन्निथला प्रसार माध्यमांशी बोलत होते. बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेतील गटनेते सतेज बंटी पाटील, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड, आमदार भाई जगताप, माजी मंत्री अस्लम शेख, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे आदी उपस्थित होते.

‘महाविकास आघाडीच्या विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपाबद्दल येत्या ७ तारखेला होणाऱ्या बैठकीत चर्चा होणार आहे. कोण किती जागा लढवणार, यावर अद्याप चर्चा झालेली नाही. मविआ सक्षम असून सर्वजण मिळून महाराष्ट्रात मविआचे सरकार आणण्यासाठी एकजुटीने निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. लोकसभा निवडणुकीत मविआला जनतेने चांगला प्रतिसाद दिला आहे. विधानसभेलाही असाच प्रतिसाद मिळेल,’’ असा विश्वास चेन्निथला यांनी व्यक्त केला.

महायुती सरकार हे गुजरात धार्जिणे असल्याचा आरोप प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी केला. ‘‘सरकारच्या लाडकी बहीण योजनेला काँग्रेसचा विरोध नाही. भाजप व सत्ताधारी पक्षातील जे लोक काँग्रेसविरोधात असा अपप्रचार करत आहेत ते पराभवाने घाबरले आहेत. तेलंगण, कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारने महिलांसाठी महालक्ष्मी योजना सुरु केलेली आहे, संजय गांधी निराधार योजना अनेक वर्षांपासून सुरु आहे. महायुती सरकारनेच काँग्रेसच्या योजनांची नक्कल केली आहे,’’ असेही पटोले म्हणाले.

महायुतीविरुद्ध आरोपपत्र

‘‘महाराष्ट्र लुटून सुरतेला देण्याचे काम सुरु आहे. महाराष्ट्रातील जमिनी, संपत्ती राज्य सरकार विकत आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र वाचवणे हाच मविआचा संकल्प आहे. या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा झाली आहे. तसेच राज्यातील विविध मुद्दे घेऊन महायुती सरकार विरोधात आरोपपत्र बनवून ते प्रसिद्ध केले जाणार आहे. त्यासंदर्भातही चर्चा झाली आहे,’’ अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या वेळी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT