minister Varsha Gaikwad sakal media
महाराष्ट्र बातम्या

दोन दिवसात शाळा उघडण्याबाबत निर्णय घेणार - वर्षा गायकवाड

कुठलीही जबरदस्ती करत शाळा सुरू करण्याचा आमचा प्रयत्न नाही असे त्यांनी स्पष्ट केले

रामनाथ दवणे, मुंबई

मुंबई: शाळा कधी सुरु होणार? याविषयी अजून संभ्रमावस्था कायम आहे. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (varsha gaikwad) यांनी या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. शाळा सुरू (School opening) करण्याचा निर्णय हा स्थानिक प्रशासनाचा आहे. कुठलीही जबरदस्ती करत शाळा सुरू करण्याचा आमचा प्रयत्न नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

"शिक्षण सचिवांनी आमचा सूचना अहवाल टास्क फोर्सकडे पाठवला आहे. याबाबत दोन दिवसांत बैठक घेत शाळा सुरू करण्याचा निर्णय होईल. विद्यार्थ्यांच्या आरोग्य, सुरक्षेला आम्ही प्राधान्य दिले आहे" असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

शाळा सुरू करण्याबाबत सरकार मध्ये कुठलाही मतभेद नाहीत असेही त्यांनी स्पष्ट केले. "काल आमची टास्क फोर्स बरोबर बैठक झाली. आमचा आणि टास्क फोर्सचा अजेंडा सारखाच आहे. मुलांच्या सुरक्षिततेला आमचं पहिलं प्राधान्य आहे. मागच्यावर्षभरात आम्ही मुलांच्या सुरक्षिततेला पहिलं प्राधान्य दिलं आहे" असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.

"मागच्या वर्षभरात मुंबई, पालघर आणि पुणे येथे शाळा सुरु झाल्या नाहीत. आम्ही निर्णयाचे विकेंद्रीकरण केलय. ग्रामीण भागात जिल्हाधिकारी आणि शहरी भागात आयुक्तांना निर्णय स्वातंत्र्य दिलं आहे" असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT