Raje Lakhujirao Jadhav samadhi  sakal
महाराष्ट्र बातम्या

Sindkhed Raja: राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधी समोर उत्खननात सापडली शेषशायी विष्णूची सुबक मूर्ती !

Raje Lakhujirao Jadhav : शिवलिंग मिळालेला परिसर खोदण्यात आल्या नंतर संपूर्ण शिवमंदिराचा धाचा येथे आढळला आहे

सकाळ वृत्तसेवा

Lord Vishnu : मातृतिर्थ सिंदखेड राजा शहरांमध्ये अनेक ऐतिहासिक वास्तू असलेल्या या शहरात अनेक मूर्ती आढळून येत आहेत.राजे लखुजीराव जाधव यांची सर्वात मोठी दगडी बांधकाम असलेली समाधी येथे सोळाशे च्या शतकात बांधली गेली याच समाधी परिसरात सध्या केंद्रीय पुरातत्व सर्वेक्षण कडून उत्खनन सुरू आहे.

समाधी परिसराची दुरुस्ती व्हावी या दृष्टीने हे काम हाती घेण्यात आले होते मात्र,याच उत्खननात मागील महिन्यात शिवलिंग आढलून आले त्यानंतर येथे सुरू असलेले उत्खनन अधिक गांभीर्याने केले जात आहे,या काम शिवलिंग मिळालेला परिसर खोदण्यात आल्या नंतर संपूर्ण शिवमंदिराचा धाचा येथे आढळला आहे.

शिवमंदिर पाय पर्यंत खोदण्यात आल्या नंतर चार दिवसापूर्वी येथे अत्यंत रेखीव कलाकुसर असलेली शेषनाग भगवंताची विश्राम अवस्थेतील मूर्ती,पायाजवळ सेवारत लक्ष्मी अशी ही मूर्ती आढळून आली आहे ही मूर्ती आढळून आल्या नंतर केंद्रीय पुरातत्व सर्वेक्षणचे नागपूर येथील वरिष्ठ अधिकारी अरुण मलिक यांनी आपल्या टीम सह येथे भेट देवून स्वतः मूर्ती काढण्यासाठी काम केले.

सोबत असलेल्या तज्ञांना मूर्ती काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना केल्या.सद्या ही मूर्ती पाया पासून पोटा पर्यंत मातीच्या बाहेर दिसत आहे. अत्यंत काळजीने ही मूर्ती काढली जात असून पुढील चार ते पाच दिवसात मूर्ती मातीतून पूर्णपणे मोकळी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

यावेळी भारतीय पुरातत्व सर्वेक्षणचे अधिक्षक भारतीय पुरात्त्वविद अरुण मलिक,सहायक शिल्पा दामगडे, शाम बोरकर, शाहीद अख्तर,दीपक सुरा यांच्यासह कामगार स्थानिक कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maha Livestock Insurance Scheme: पशुधन विम्याचा भार होणार हलका; ८५ टक्के अनुदानावर मिळणार विमा

शूटिंगच्या पहिल्या दिवशी मृणाल दुसानिस खूप रडलेली, 'माझिया प्रियाला...' मालिकेबद्दल बोलताना म्हणाली; “ आईकडे पाहत मी रडत होते”

RTOने दंडात्मक कारवाईनंतर कागदपत्रे बराच वेळ दिली नाही, चालकानं समृद्धीवर ट्रकच आडवा लावला; वाहतूक तासभर ठप्प, VIDEO VIRAL

Marathi News Live Updates : गृहमंत्री अमित शहा संसदेत निवेदन देणार? 'या' 2 मोठ्या मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक, अधिवेशनाचा शेवटचा आठवडा ठरणार वादळी!

BMC: नगरसेवकांना 'अ‍ॅपल'चे टॅब, महापालिकेचा कारभार आता कागदमुक्त होणार

SCROLL FOR NEXT