police case

 

solapur

महाराष्ट्र बातम्या

माढा तालुक्यात ‘एक्साईज’च्या अधिकाऱ्यास ढाब्यावर बेदम मारहाण, अंमलदारही जखमी! 'राज्यात सगळीकडे ढाब्यांवर मद्यविक्री, तरी आम्हीच दिसतो का' म्हणून मारहाण

जगदंबा व येडेश्वरी या ढाब्यांवर अवैध मद्यविक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर बुधवारी (ता. २२) रात्री साडेआठच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक त्याठिकाणी गेले होते. त्यावेळी येडेश्वरी ढाब्याचे मालक प्रमोद गोरे पाटील ऊर्फ गोट्या याने पथकातील अधिकाऱ्यांसमवेत वाद घातला.

तात्या लांडगे

सोलापूर : उपळाई हद्दीतील (ता. माढा) येडेश्वरी ढाब्यावर अवैध मद्यविक्री सुरू असल्याची खबर राज्य उत्पादन शुल्क विभागाला टोल फ्री क्रमांकावर मिळाली होती. त्याठिकाणी कारवाईसाठी गेल्यावर ढाबा मालकाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी, अंमलदारासमवेत वाद घातला. त्यावेळी झालेल्या मारहाणीत उपनिरीक्षक अमित नागरे, अंमलदार युवराज टिळे हे दोघे जखमी झाले आहेत.

जगदंबा व येडेश्वरी या ढाब्यांवर अवैध मद्यविक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर बुधवारी (ता. २२) रात्री साडेआठच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक त्याठिकाणी गेले होते. त्यावेळी येडेश्वरी ढाब्याचे मालक प्रमोद गोरे पाटील ऊर्फ गोट्या याने पथकातील अधिकाऱ्यांसमवेत वाद घातला. ‘राज्यात सगळीकडे ढाब्यांवर मद्यविक्री, तरी आम्हीच दिसतो का, तुम्ही आमच्याच ढाब्यावर कसे येता’ असे तो म्हणत होता. यापूर्वीही त्याच्याविरुद्ध असेच दोन गुन्हे दाखल आहेत. बुधवारी त्याने गावातील नातेवाईकांना, मित्रांना बोलावून घेऊन गोंधळ घातला.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्लास्टिक पाईपने मारहाण केली. तत्पूर्वी, गोंधळ सुरू असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अंमलदार मोबाईलमध्ये व्हिडिओ शुटिंग काढत होते. त्यांचा मोबाईल त्याने काढून घेतला, तो परत दिलाच नाही. त्याठिकाणी झालेल्या मारहाणीत दोघे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. उपनिरीक्षक नागरे यांच्या डोक्याला जखम झाली आहे.

वाद घालून मारहाण करणाऱ्यांविरुद्ध फिर्याद

मारहाण प्रकरणी संबंधितांविरुद्ध माढा पोलिसांत शासकीय कामांत अडथळा आणल्याची फिर्याद देत आहोत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT