In Maharashtra, 4,024 new corona patients died in 24 hours In Maharashtra, 4,024 new corona patients died in 24 hours
महाराष्ट्र बातम्या

महाराष्ट्रात २४ तासांत कोरोनाचे ४,०२४ नवीन रुग्ण तर २ दोघांचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक होताना दिसत आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. बुधवारी महाराष्ट्रात २४ तासांत ४,०२४ नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. तर ३,०२८ रुग्ण बरे झाले. शिवाय दोघांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रात सक्रिय रुग्णांची संख्या १९,२६१ झाली आहे. राज्यात बीए.५ प्रकारातील चार रुग्ण नोंदवल्याची माहिती बी. जे. मेडिकल कॉलेज, पुणेने अहवालात म्हटले आहे. (In Maharashtra, 4,024 new corona patients died in 24 hours and 2 died)

मंगळवारी महाराष्ट्रात कोरोना (Corona) संसर्गाचे २,९५६ नवे रुग्ण आढळले होते. त्याचवेळी चार जणांचा मृत्यू झाला होता. दुसरीकडे एकट्या मुंबईत कोरोना संसर्गाचे १,७२४ नवीन रुग्ण आढळले होते. मुंबई महानगरातील संसर्गाचे प्रमाण १५.५८ टक्क्यांवर पोहोचले आहे. आज मात्र यात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.

सोमवारी मात्र दोन दिवसांपेक्षा कमी रुग्ण सापडले होते. सोमवारी महाराष्ट्रात कोरोनाचे १,८८५ नवीन रुग्ण आढळले होते. रविवारच्या तुलनेत सोमवारी कोरोना रुग्णांच्या संख्येत ३६ टक्क्यांनी घट झाली होती. ही घट एक दिवसासाठीच होती. कारण, बुधवारी ४,०२४ रुग्ण आढळून आले. सोबतच दोन जणांचा मृत्यूही झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT