सध्या प्रत्येक तासाला कोरोनाचे 2 हजार नवीन रुग्ण आढळून येत आहेत.  
महाराष्ट्र बातम्या

महाराष्ट्रात कोरोनाचं तांडव, प्रत्येक तीन मिनिटाला एकाचा बळी

सध्या प्रत्येक तासाला कोरोनाचे 2 हजार नवीन रुग्ण आढळून येत आहेत. आकडेवारीनुसार 2859 लोक प्रत्येक मिनिटाला कोरोना विषाणूच्या संपर्कात येत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. रोज हजारोंच्या संख्येने नवे रुग्ण आढळून येत आहेत. सध्या प्रत्येक तासाला कोरोनाचे 2 हजार नवीन रुग्ण आढळून येत आहेत. आकडेवारीनुसार 2859 लोक प्रत्येक मिनिटाला कोरोना विषाणूच्या संपर्कात येत आहेत. इतकेच नव्हे तर दर तीन मिनिटाला या विषाणूमुळे एकाचा मृत्यू होत आहे. महाराष्ट्रात रविवारी कोरोनाचे 68 हजार 631 नवे रुग्ण समोर आले आहेत.

महाराष्ट्रातच पहिल्यांदाच एका दिवसात कोरोना इतक्या मोठ्याप्रमाणात रुग्ण सापडले आहेत. नवीन प्रकरणांनंतर आता राज्यात कोरोनाचे एकूण 38 लाख 39 हजार 338 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. इतकेच नव्हे तर रविवारी राज्यात विक्रमी 503 मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे आता कोरोनामुळे बळी जाणाऱ्यांचा आकडा 60 हजार पार गेला आहे. नवीन प्रकरणात 8 हजार 468 केस हे मुंबईतील आहेत. एकट्या मुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे 12 हजार 354 जणांचा जीव गेला आहे. यामध्ये 53 मृत्यू रविवारी नोंदवण्यात आले आहेत.

सध्या महाराष्ट्रात 'मिनी लॉकडाऊन' सुरु आहे. यामध्ये अनेक अटी घालण्यात आल्या आहेत. परंतु, याचा अद्याप परिणाम दिसून आलेला नाही. राज्यात विकेंड लॉकडाऊन, कलम 144 ही लागू करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. राज्यात ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. याचदरम्यान, भारतीय रेल्वेने 'ऑक्सिजन एक्स्प्रेस' रेल्वेच्या माध्यमातून राज्यात लिक्विड मेडिकल ऑक्सिजन आणि ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा करणार असल्याचे जाहीर केले आहे.

दरम्यान, राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्रातील एकाही कोरोना रुग्णाचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला नसल्याचा दावा केला. हे रुग्ण हॉस्पिटलमध्ये उशिराने येत असल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचेही त्यांनी म्हटले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Education Crisis: अर्धापूरात ८४ शिक्षक बीएलओ कामात अडकले; दोन-दोन वर्गांवर एकच शिक्षक, विद्यार्थ्यांच्या शिक्षणहक्कावर गदा

रविवार ठरणार खास! आयुष्मान योगामुळे 2 राशींची लागणार लॉटरी; जाणून घ्या तुमचं भविष्य

Why Eyes Twitch: डोळा सारखा फडकतोय ? समजू नका सामान्य; शरीरात असू शकते या घटकाची कमतरता!

मराठी अभिनेत्रीसोबत केलेलं लग्न पण घटस्फोटाने पूर्ण खचले, यतीन कार्येकर यांनी पहिल्यांदाच बोलले; मी कामात होतो तेव्हा ती...

Ambad car theft case : अंबड तालुक्यातील कार चोरीचा अवघ्या सहा तासांत उलगडा; दोन चोरटे जेरबंद, शस्त्रांसह स्विफ्ट डिझायर कार जप्त

SCROLL FOR NEXT