cars  File photo
महाराष्ट्र बातम्या

कोल्हापुरातील RTO कर घोटाळा 15 कोटीच्या घरात

मंत्रालय स्तरावरील अनेक वरिष्ठांचे हात ओले करण्यात आले

प्रशांत कांबळे ः सकाळ वृत्तसेवा

मुंबई: कोल्हापुरात (Kolhapur) रुजू झाल्यापासून आरटीओ (RTO) स्टव्हिन अल्वारीस यांनी गाड्यांचा टॅक्स बुडवून सुमारे 15 कोटी रूपयांचा घोटाळा केल्याचा आरोप स्थानिक दत्ताजी टिपूगडे यांनी केला आहे. यासंदर्भातील भ्रष्टाचाराच्या तक्रारी (corruption complaint) त्यांनी राज्य परिवहन आयुक्त, परिवहन एसीबी व्हिजिलन्स, प्रधान सचिव परिवहन विभाग आणि परिवहन मंत्री अनिल परब (anil parab) यांना पाठवली आहे. त्यावरून आता पुन्हा आरटीओ अल्वारिस यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. (In maharashtra Kolhapur rto car scam around 15 crore)

अल्वारिस यांनी जुन्या जेसीबी वाहनांच्या मालकांचा प्रलंबित कर क्लार्क आणि एजंटांना हाताशी धरून माफ करून, करातील 50 टक्के रक्कम लाटली आहे. त्याप्रमाणेच विविध कंपनीच्या वाहनांच्या किमती कमी दाखवून आतापर्यंत शासनाची कर चोरी केली आहे. जेसीबीची एमएच 09 सिएल सीरीज जुनी आहे. मात्र, त्याचा नव्या सीरिज मध्ये वापर करतांना सगळ्यात जास्त कर घोटाळा केल्याचाही आरोप टिपूगडे यांनी केला आहे.

घोटाळ्यासाठी अल्वारिस यांच्या लॉगिन आयडीचा वापर

नवीन 623 उच्च दर्जाच्या गाड्यांना कोटयावधी रूपयाचा टॅक्स घोटाळा, डिलरशी संगनमत करून महागड्या गाड्याची फी व टॅक्स न घेता रजीस्टर करण्याचे काम आरटीओ अल्वारीस यांच्या शासकीय संगणकाच्या लॉगिन आयडीतून करण्यात आले आहे. ज्यामध्ये शासनाचा कर कसा लाटण्यात आला त्याचे पुरावे असल्याचे टिपूगडे यांनी तक्रारीत म्हटले आहे.

कर घोटाळ्यात अनेकांचे हात ओले

कोल्हापुरातील कर घोटाळ्यात मंत्रालय स्तरावरील अनेक वरिष्ठांचे हात ओले करण्यात आले आहे. तर सुमारे 15 कोटींचा असलेला कर घोटाळा सोयीस्कररित्या मार्गी लावण्यासाठी पुणे आरटीओ अजित शिंदे यांच्या मर्जीतीलच कर्मचाऱ्यांना लेखपरिक्षणाची जबाबदारी देऊन दीड कोटींचा करण्यात आला आहे. तर यासाठी परिवहन विभागातील वरिष्ठांचाही आशीर्वाद असल्याचा आरोप सुद्धा टिपूगडे यांनी केला आहे.

अल्वारीस यांना निलंबित करून फौजदारी गुन्हा दाखल करा आणि राज्य शासनाचा बुडवलेला कर उच्च स्तरीय चौकशी लावून वसूल करण्यात यावा, यासंदर्भातील सर्व पुरावे माझ्याकडे आहे. त्यामुळे येत्या 7 दिवसात तक्रारीला न्याय दिला नाही तर उच्च न्यायालयात जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही.

- दत्ताजी टिपुगडे, तक्रारकर्ते

परिवहन विभागाकडे अशा अनेक तक्रारी येत असतात. त्या सर्व तक्रारींचे तथ्य तपासून बघणे आवश्यक असते. त्याप्रमाणे या तक्रारीची सुद्धा चौकशी करण्यात येईल, दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल.

- अविनाश ढाकणे,आयुक्त, परिवहन विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd ODI: विराट कोहलीचा चौकार अन् मोडला राहुल द्रविडच्या नावावरील मोठा विक्रम! इंग्लंडमध्येही ठरला 'किंग'

IND vs ENG 2nd ODI: अनपेक्षित... भारतीय संघात एक बदल; विजयी संघात बदल करण्याची वेळ का आली? शुभमन गिल म्हणाला...

भारतातून OnePlus ची एक्झिट? 2027 पर्यंत कंपनी बंद होणार असल्याची चर्चा; ज्यांच्याकडे आत्ता मोबाईल आहे त्यांनी काय करायचं? वाचा

Latest Marathi News Live Update : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सिया आणि चेतनची न्यायालयीन कोठडी कायम

Varandha Ghat Landslide Risk: वरंधा घाटात दरडींचा धोका कायम; रस्त्याशेजारील मातीचे ढिगारे तातडीने हटवण्याची मागणी

SCROLL FOR NEXT