Nitin Gadkari: "नगरहून जाणार सुरत-चेन्नई महामार्ग"  sakal
महाराष्ट्र बातम्या

'संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग एक ते दीड वर्षात बांधण्याचा प्रयत्न करु'

हा पालखी मार्ग २२१ किलोमीटरचा असून ७ हजार कोटी रुपये खर्च आहे.

दीनानाथ परब

मुंबई: "महाराष्ट्रात संतांच खूप मोठं योगदान आहे. पंढरपूर (Pandharpur) विशेष प्रेरणा स्थान आहे. पंढरपूरला चार वेळा यात्रा होते. आषाढीला (Ashadhi) मोठ्या संख्येने वारकरी येतात. वारकरी (Warkari) चालत येतात. त्यांच्या पायात चप्पला नसतात. माझ्या विभागाकडून मला पालखी मार्ग निर्माण करण्याची संधी मिळाली हे माझं भाग्य आहे" असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin gadkari) म्हणाले. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्ग भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.

"सांस्कृतिक विरासत मजबूत करण्यासाठी ५० धार्मिक स्थळं भारतामालामध्ये समाविष्ट केली. पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली चारधाम, बद्रीनाथ, गंगोत्री, यमुनोत्री यात्रा मार्ग १२ हजार ७० कोटी खर्चून ३७३ किलोमीटरमार्ग पूर्ण होत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीनंतर ८२७ किमी मार्गाचे काम सुरु होईल" असे गडकरी म्हणाले.

"मानसरोवर पर्यंत जाणारा मार्ग बनवण्यासाठी प्रयत्न करतोय. आज मला आनंद होत आहे. महाराष्ट्रात माहूर रेणकुा मंदिर, तुळजाभवानी मंदिर, पैठण संत एकनाथ महाराज, शेगाव गजानन महाराज, शिर्डी साईबाबा हा भक्तीमार्ग पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरु आहे" असे गडकरी म्हणाले.

"संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग २२१ किलोमीटरचा असून ७ हजार कोटी रुपये खर्च आहे. संताच्या आशिर्वादाने एक ते दीड वर्षात हा मार्ग बांधण्याचा प्रयत्न करु. संत तुकाराम महाराज पालखी मार्ग १३० किलोमीटरचा असून ५ हजार कोटी खर्च आहे" असे गडकरी म्हणाले. पालखी मुक्काम तळासाठी राज्य सरकराने तीर्थक्षेत्र विकास योजनेत १४२८ कोटी मंजूर केले. पालखी मार्गावर वारकरी येतात, त्यांना सुविधा मिळाली पाहिजे, असे गडकरी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: जे बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, राज ठाकरेंकडून भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांवर टीका

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

Mumbai : आमचं नातं शरीर संबंधाच्या पलिकडचं, आजही...; विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT