Bribe esakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! ‘प्रशासकराज’मध्ये शासकीय कार्यालयांना टक्केवारीचे ग्रहण! 3 वर्षांत ‘लाचलुचपत’ची 3201 जणांवर कारवाई; स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येच 493 कारवाया

सोलापूरसह राज्यातील २७ महापालिका, २४३ नगरपालिका, ३७ नगरपंचायती व २६ जिल्हा परिषदांसह बहुतेक पंचायत समित्यांवर ७ व २१ मार्च २०२२ पासून प्रशासकराज आहे. लोकप्रतिनिधी नसल्याने अनेक अधिकारी-कर्मचारी मनमानी करीत सामान्यांच्या कामाची अडवणूक करून पैसे तथा लाच मागत असल्याचे प्रकार वाढल्याचे चित्र आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यातील सोलापूरसह २७ महापालिका, २४३ नगरपालिका, ३७ नगरपंचायती व २६ जिल्हा परिषदांसह बहुतेक पंचायत समित्यांवर ७ व २१ मार्च २०२२ पासून प्रशासकराज आहे. लोकप्रतिनिधी नसल्याने अनेक अधिकारी-कर्मचारी मनमानी करीत सामान्यांच्या कामाची अडवणूक करून पैसे तथा लाच मागत असल्याचे प्रकार वाढल्याचे चित्र आहे. मार्च २०२२ ते २० जानेवारी २०२५ या काळात एक हजार अधिकारी, कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात सापडल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यातील बहुतेक महापालिकांवर ७ मार्च २०२२ रोजी प्रशासकराज सुरू झाले असून जिल्हा परिषदांची जबाबदारी पण २१ मार्च २०२२ पासून प्रशासकांवरच आहे. लोकहिताची कामे सभागृहात मांडून त्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याची प्रमुख जबाबदारी लोकप्रतिनिधींवर असते. एखाद्या सामान्य लोकांची किंवा गावकऱ्यांनी सुचविलेले विकासकाम अडवून त्यासाठी कोणी पैसे किंवा टक्केवारी मागत असल्यास त्याच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सभागृहाला असतात. त्यामुळे लोकप्रतिनिधी असल्यास अधिकारी देखील घाबरून असतात. मात्र, मागील वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासकराज असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल करून सामान्यांकडून किंवा मक्तेदारांकडून मंजूर कामात टक्केवारी मागण्याचे आणि कामे मंजूर करताना लाच मागणे, घेण्याचे प्रकार वाढल्याची वस्तुस्थिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईतून समोर आली आहे.

टक्केवारी, कामाची बिले काढण्यासाठी लाच मागण्याचे प्रकार वाढले

लाच मागणे किंवा स्वीकारणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील ९५ जणांविरुद्ध आमच्या विभागाने मागील तीन वर्षांत सापळे रचून कारवाई केली आहे. त्यात केलेल्या कामांची बिले काढण्यासाठी पैसे मागितले, कामाच्या बिलाच्या एकूण रकमेतील काही टक्के मागणे, काम अडवून पैसे मागण्याचे गुन्हे सर्वाधिक आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यावर कारवाई होतेच, असा विश्वास सामान्यांना असल्याने तक्रारी व कारवाईचे प्रमाण वाढत आहे.

- गणेश कुंभार, उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर

शिक्षण अन्‌ विधी व न्याय विभागातही कारवाई

ज्या शिक्षण विभागातून विद्यार्थ्यांना चांगला नागरिक होण्याचे धडे दिले जातात, त्याच शिक्षण विभागात मागील तीन वर्षांत १८७ जण लाचलुचपतच्या जाळ्यात सापडले आहेत. त्या शिक्षणाधिकाऱ्यापासून लिपिकापर्यंत लोक आहेत. याशिवाय राज्याच्या विधी व न्याय विभागातील २२ जणांवर देखील लाच घेताना किंवा मागितल्याप्रकरणी कारवाई झाली आहे. या दोन्ही विभागालाच आता भ्रष्टाचारमुक्तीचे धडे देण्याची गरज निर्माण झाली आहे.

३ वर्षातील सोलापूर जिल्ह्यातील कारवाई

  • सन कारवाया

  • २०२२ ३१

  • २०२३ ३३

  • २०२४ २८

  • २०२५ ०३

  • एकूण ९५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

Nashik Ration Shops : ग्रामपंचायती अन् बचत गटांची प्रतीक्षा संपणार कधी? नवीन रेशन परवान्यांसाठी नाशिककर आक्रमक

Pune News: वारज्यात महामार्गाचीच कोंडी! दीड किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागतो दीड तास; काय आहेत काेंडीची कारणे..

फक्त एका मालिकेमुळे रातोरात प्रसिद्ध झाली अभिनेत्री नंतर अचानक झाली गायब; आता ओळखणंही झालं कठीण

Latest Marathi News Update : नाशिकच्या दरी मातोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

SCROLL FOR NEXT