Sangli News Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sangli News: खासगी रुग्णालयात रुग्णावर जादूटोण्याने उपचाराचा प्रयत्न सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघड

विविध संस्था जादूटोणा, अंधश्रद्धा, बळी, अशा प्रथा परंपरा बंद करण्यासाठी प्रयत्न करतात

सकाळ डिजिटल टीम

राज्यात एकीकडे जनजागृती करण्यासाठी विविध संस्था जादूटोणा, अंधश्रद्धा, बळी, अशा प्रथा परंपरा बंद करण्यासाठी प्रयत्न करत राहतात. अथक प्रयत्न करूनही सर्रासपणे असे प्रकार दिसून येतात. सर्रासपणे अंधश्रद्धा पाळल्याचे दिसून येतात. अंधश्रद्धा आणि जादूटोणाच्या यासारख्या गोष्टी कमी करण्यासाठी राज्यात अंनिस आणि इतर संघटना देशभरात काम करत आहेत.

अशातच सांगलीमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सांगली जिल्ह्यामधील आटपाडी तालुक्यामध्ये एका खासगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातीमध्ये असणाऱ्या रुग्णाच्या डोक्यावर हात ठेवून काहीतरी मंत्रतंत्र म्हणत जादूटोणा करून उपचार करण्याचा प्रयत्न सुरू होता. हा सर्व प्रकार रुग्णालयात सुरू असताना डॉक्टरांनी विरोध केला म्हणून त्यांच्याशी हुज्जत घालण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

या घटनेसंदर्भात संपतराव नामदेव धनवडे यांनी आटपाडी पोलिस स्टेशनमध्ये निवेदनाद्वारे तक्रार दिली आहे. रुग्णालयातील सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात सर्व प्रकार कैद झाला आहे. संबंधित प्रकार उघड झाल्यानंतर सर्वसामान्यांकडून या प्रकरणावर संताप व्यक्त केला जातोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT