Water tanker esakal
महाराष्ट्र बातम्या

पावसाळ्यात गेल्यावर्षीपेक्षा 244 टँकरद्वारे अधिक पाणीपुरवठा

महेंद्र महाजन

नाशिक : राज्यात राजकीय गोंधळाचा महापूर आला असला, तरीही वरुणराजा जनतेच्या घशाला पडलेली कोरड काही केल्या कमी करण्याचे नाव अद्याप घेताना दिसत नाही. जूनमधील सर्वसाधारण पावसाच्या तुलनेत आतापर्यंत ५३.६ टक्के पाऊस झाला असून गेल्यावर्षी १४१.४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. तसेच गेल्यावर्षीच्या तुलनेत आता राज्यात २४४ अधिक म्हणजेच, ५२७ टँकरद्वारे ६३४ गावे आणि १ हजार ३९६ वाड्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे.

सर्वाधिक १२५ टँकरद्वारे नाशिक विभागातील १५६ गावे व ३३५ वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. त्याखालोखाल सिंधुदुर्ग जिल्ह्याचा अपवाद वगळता २२० गावे आणि ६७६ वाड्यांना ११६ टँकरद्वारे कोकण विभागात पाणी पोचवण्यात येत आहे. सोलापूर, कोल्हापूर, उस्मानाबाद, लातूर, अकोला, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात एकही टँकर सुरु नाही. गेल्यावर्षी ३२४ गावे आणि २११ वाड्यांसाठी २८३ टँकर सुरु होते. मागील आठवड्यात ५९१ गावे आणि १ हजार ३१२ वाड्यांसाठी ५०१ टँकर धावत होते. पश्‍चिम महाराष्ट्रातील ७८ गावे आणि ३४६ वाड्यांसाठी ७९, मराठवाड्यातील ७१ गावे आणि ३९ वाड्यांसाठी ९४, तर अमरावती विभागातील ९० गावांसाठी ९१, नागपूर जिल्ह्यातील १९ गावांसाठी २१ टँकर सुरू आहेत.

औरंगाबाद विभागात अधिक पाऊस

राज्यातील औरंगाबाद विभागात सर्वाधिक ८५.२ टक्के पाऊस औरंगाबाद विभागात झाला आहे. गेल्यावर्षी या विभागात १४०.३ टक्के पावसाची नोंद झाली होती. इतर विभागनिहाय आतापर्यंत सर्वसाधारण पावसाच्या तुलनेत झालेल्या पावसाची टक्केवारी पुढीलप्रमाणे असून (कंसात गेल्यावर्षीच्या पावसाची टक्केवारी दर्शवते) : कोकण-३९.३ (१५५.६), नाशिक-६०.७ (७२.५), पुणे-३४.६ (१३७.७), अमरावती-६८.७ (१४८.६), नागपूर-५३.३ (१२९.१). दरम्यान, जिल्ह्यांचा विचार करावयाचा झाल्यास सर्वाधिक ९२ गावे आणि १६१ वाड्यांसाठी ८५, त्याखालोखाल पुणे जिल्ह्यातील ५९ गावे आणि ३०८ वाड्यांसाठी ६५ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

जिल्हानिहाय टँकरची स्थिती

जिल्ह्याचे नाव - गावे - वाड्या - टँकर

ठाणे - ४९ - १६७ - ३२

रायगड - ५८ - २४५ - ३७

रत्नागिरी - ९० - १८९ - १७

पालघर - २३ - ७५ - ३०

धुळे - २ - २ - २

नंदूरबार - ० - २ - १

जळगाव - १० - ० - ९

नगर - ५२ - १७० - २८

सातारा - १६ - ३७ - १२

सांगली - ३ - १ - २

औरंगाबाद - ४ - १ - ५

जालना - ३३ - २१ - ४३

बीड - ६ - ४ - ८

परभणी - २ - ० - १

हिंगोली - १४ - ० - २०

नांदेड - १२ - १३ - १७

अमरावती - २२ - ० - २६

वाशीम - ८ - ० - ८

बुलडाणा - २९ - ० - २९

यवतमाळ - ३१ - ० - २९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT